विलास गावंडे यवतमाळ : लोकसभेसाठी विदर्भात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. याकरिता निवडणूक विभागाने एसटी बसची मागणी नोंदविली आहे. विदर्भातील सर्व नऊही विभागांमधून २,३३३ बस पुरविल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक एसटी बसची मागणी नागपूर विभागाकडे ३७० इतकी नोंदविण्यात आली आहे. या बसद्वारे मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी आणि निवडणुकीच्या साहित्याची ने-आण केली जाणार आहे.
विदर्भात १९ आणि २६ एप्रिल अशा दोन टप्प्यांत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या कामासाठी वाहतुकीच्या दृष्टीने एसटी बसची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार महामंडळाने निवडणूक कार्यासाठी बुकिंग करून घेतले आहे.