लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय रस्ते निधीमधून (सीआरएफ) जिल्ह्यात सुमारे अडीचशे कोटी रुपयांची कामे हाती घेतली गेली. मात्र पैशाअभावी ही कामे संथगतीने सुरू आहे. एकीकडे निधीअभावी देयके प्रलंबित आहेत. तर दुसरीकडे पुढील सहा महिन्यात ही सर्व कामे पूर्ण करायची आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यापुढे पेच निर्माण झाला आहे.जानेवारी २०१६ मध्ये जिल्ह्यात केंद्रीय रस्ते निधीतील अडीचशे कोटींची कामे सुरू झाली. आर्णी रोड, धामणगाव रोड, कोळंबी ते घाटंजी, यवतमाळ ते अकोलाबाजार, पुसद ते गुंज, राजीवनगर-आर्णी-दिग्रस, पिंपळखुटी-पारवा, झरीजामणी, दिग्रसमधील पूल, पुसदमधील आणखी एक काम आदी कामे हाती घेण्यात आली. गेली वर्षभर कंत्राटदारांनी ही कामे वेगाने केली. मात्र एक पैसाही त्यांच्या पदरी पडला नाही. आजच्या घडीला सुमारे ५० कोटींची देयके ‘सीआरएफ’मध्ये प्रलंबित आहे. लगेच पैसे मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांनी या बांधकामांची गती अतिशय संथ केली आहे. केंद्राने राज्याला ६०० कोटी दिले, मात्र सहा महिन्यांपासून ही रक्कम पडून आहे. कंत्राटदारांना दीड वर्षात ही बांधकामे पूर्ण करायची आहे. त्यातील एक वर्ष लोटले. आता काम पूर्ण करण्यासाठी केवळ सहा महिने शिल्लक आहेत. निधीअभावी देयके रखडली, पर्यायाने कामाची गती संथ झाली. त्यामुळे आगामी सहा महिन्यात ही दहा ते बारा कामे पूर्ण होणार कशी, हा प्रश्न आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने वार्षिक बजेट पेक्षा पाचपट अधिक रकमेच्या निविदा काढल्याने हा संपूर्ण घोळ निर्माण झाल्याचे सांगितले जाते.‘सीआरएफ’ची जिल्ह्यात ११ कामे आहेत. यातील पुसदचे काम पूर्ण झाले असून पांढरकवडा व भुगाव-नखेगावचे काम पूर्णत्वाकडे आहे. इतर कामे ४० ते ४५ टक्के झाली आहे. जिल्ह्यात ३५ ते ४० कोटींचे देयके प्रलंबित आहे. शासनस्तरावरून जानेवारीपर्यंत निधी प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. बांधकामांच्या प्रगती व गुणवत्तेवर नजर आहे.- शशीकांत सोनटक्केअधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, यवतमाळ.
केंद्रीय रस्ते निधीतून अडीचशे कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 9:45 PM
केंद्रीय रस्ते निधीमधून (सीआरएफ) जिल्ह्यात सुमारे अडीचशे कोटी रुपयांची कामे हाती घेतली गेली. मात्र पैशाअभावी ही कामे संथगतीने सुरू आहे. एकीकडे निधीअभावी देयके प्रलंबित आहेत.
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम : निधीचा पत्ता नाही, उरले केवळ सहा महिने, ५० कोटींची देयके थकीत