खासदारांचे श्रमदान : लोकसहभागातून तलावातून गाळ काढण्याचा उपक्रमउमरेखड : पाणीटंचावर मात करण्यासाठी तालुक्यातील पोफाळी येथील तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या उपक्रमाला प्रारंभ झाला असून, गुरूवारी हिंगोलीचे खा. राजीव सातव यांच्यासह शेकडो लोकांनी श्रमदान केले. त्याच वेळी अवघ्या तासाभरात अडीच लाख लोकवर्गणी गोळा झाली. पोफाळी परिसरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन गाळ उपसण्यास प्रारंभ केला. या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. महिलांसह अनेक जण येथे श्रमदान करू लागले तर काही जणांनी आर्थिक मदतही दिली. गुरूवारी सकाळी ६ वाजता हिंगोलीचे खा. सातव अंबोना तलावावर आले. त्यांच्यासोबत माजी आमदार विजय खडसे, महिला बालकल्याण सभापती विमलताई चव्हाण उपस्थित होते. यावेळी खासदारांनी तब्बल दोन तास श्रमदान केले. त्यानंतर याच परिसरात उपस्थित सर्वांची बैठक घेतली. त्यावेळी शासन आणि खासदार फंडातून गाळ काढण्यासाठी मदत देणार असल्याचे सांगितले. यावेळी वसंतराव नाईक संस्थेचे कर्मचारी व संस्थाचालक विजय जाधव यांनी या उपक्रमासाठी ५१ हजाराची लोकवर्गणी दिली. तसेच पोफाळीच्या शिवाजी विद्यालातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी ५१ हजार रुपये दिले. तर युवा उद्योजक शंकर चव्हाण, रमेश चव्हाण, बळीराम चव्हाण यांनी प्रत्येकी २५ हजार तर अॅड़ युवराज देवसरकर यांनी २६ हजार, कैलास पवार यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे तासाभरात अडीच लाख रुपये गोळा झाले. या तालावातील काळ काढल्यामुळे पावसाळ््या साठवण क्षमता वाढून पाणीटंचाईवर मात होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
पोफाळीत तासाभरात अडीच लाख लोकवर्गणी
By admin | Published: May 20, 2016 2:12 AM