शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

चापडोह, बोरगावसह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो

By admin | Published: July 27, 2016 12:42 AM

जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

सतर्कतेचा इशारा : निम्न वर्धाचे नऊ दरवाजे उघडले यवतमाळ : जुलै महिन्यात कोसळलेल्या धुंवाधार पावसाने प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहेत. हवामान खात्याने बुधवारपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यामुळे पाच तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. चापडोह आणि बोरगाव प्रकल्पासह २५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे. आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. यामुळे जलाशयाच्या साठवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जुलैच्या प्रारंभी सायखेडा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर १५ दिवसाच्या कालखंडात चापडोह आणि बोरगाव प्रकल्पही ओव्हर फ्लो झाला. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प १२ जुलैला ओव्हर फ्लो झाला होता. यानंतर आठ दिवसाच्या अंतराने चापडोह प्रकल्प ओव्हर फ्लो झाला. यावर्षीच्या उन्हाळ्यात चापडोह प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. यामुळे चापडोह प्रकल्प उशिरा ओव्हर फ्लो झाला. शहराला पाणी पुरवठा करणारे दोनही प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने यावर्षी यवतमाळकरांना मुबलक पाणी मिळणार आहे. मध्यम प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा सायखेडा आणि बोरगाव प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. गोकी प्रकल्पामध्ये ९१ टक्के पाणी साठा आहे. नवरगाव मध्ये ९५ टक्के, लोअरपूसमध्ये ७७ टक्के, वाघाडी ७० टक्के, मोठा पूस ५४ टक्के, अरूणावती प्रकल्पात ४२ टक्के, अडाण प्रकल्पात ३८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. लघु प्रकल्पातील जामवाडी, कापरा, सिंगनडोह, पिंपळखुटी, रूई, ईटोळी, किन्ही, मारेगाव, दुधाना, चोरकुंड, पहूर तांडा, पहूर ई, मुरझडा, करंजी, झोटींगधर, म्हैस दोडका, नरसाळा, पोखरी, निंगणूर, सेनद, दराटी, मुडाना, तरोडा आणि पोफाळी या प्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील इतर ६२ लघु प्रकल्पात सरासरी ७० टक्के जलसाठ निर्माण झाला आहे. यातून मोठ्या प्रमाणात सिंचन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सततच्या पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे. या ठिकाणावरून १३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रकल्प पात्राच्या क्षेत्रात येणाऱ्या कळंब, बाभूळगाव, वणी, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)