लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विधानसभा निवडणूकीत मतदानाची प्रक्रिया पारपाडतांना मतदारांना आरोग्याचा कुठलाही प्रश्न भेडसावू नये म्हणून जिल्ह्यातील अडीच हजार मतदान केंद्रावर आरोग्य यंत्रणा सज्ज राहणार आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर औषधी ठेवली जाणार आहे.
प्रत्येक मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात औषधोपचार साहित्य ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. या ठिकाणी इलेक्ट्रोल पावडर, पॅरासिटीमॉल, क्रोसिन गोळ्या या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावर कुनाला चक्कर आली, अथवा ताप आली तरी तत्काळ या ठिकाणी उपचार करता येणार आहे. त्या दृष्टीने आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यवतमाळ, वणी, राळेगाव, आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड या सात विधानसभा मतदार संघात २० नाव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील अडीच हजार मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करणार आहे.
यामुळे संपूर्ण मतदाराला दिलासा मिळणार आहे. संपूर्ण औषधी बुथवर औषधी साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आहेत. जी औषधी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसेल त्याची जिल्हा आरोग्य केंद्रातून मागणी करण्यात यावी. जिल्हा स्तरावरून औषधी उपलब्ध न झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरील निधीतून औषधी उपलब्ध ठेवावी या बाबी प्रमाणीत करण्यात याव्या. अशी सूचना यावेळी आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
आपल्याला बीपी आहे, घाबरू नका, औषध मिळेलमतदान केंद्रावर मतदानासाठी जाणाऱ्या रुग्णांना औषधी उपलब्ध राहणार आहे. यामुळे एखाद्या मतदाराची प्रकृती खालावली तरी त्यावर तत्काळ उपचार केला जाणार आहे. यामुळे बीपी असणार पेशंट या केंद्रावर गेला आणि त्याचा बीपी वाढला तरी उपलब्ध गोळ्यांमुळे त्याचा बीपी कंट्रोल करता येणार आहे. यामुळे मतदानाच्या लांबलचक रांगेत उभ्या असणाऱ्या मतदाराला घरचा दवाखाना असावा तशी ट्रीटमेंट असणार आहे.