लोकमत न्यूज नेटवर्क बाभूळगाव : धावत्या एसटी बसवर मागून दुसरी बस आदळून झालेल्या अपघात २६ प्रवासी जखमी झाल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील चिमणाबागापूर- अंतरगावजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. यवतमाळ आगाराची बस बाभूळगावकडे येत होती. त्यावेळी मागाहून आलेल्या भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. त्यात बसमधील वैशाली पचारे, हनुमंत गांगुलवार, प्रभाकर पवार, पवन मांढरे, पवन उके, सुमन सव्वालाखे, रवींद्र पंधरे, नारायण चौधरी, सागर आखरे, गिरीधर करडे, सौरभ जिरापुरे, वसंत पेंदोर, कृष्णा शिवरकर, अक्षय देशमुख, प्रभाकर पवार, पुष्पा मोहळे, माधुरी डोंगरे, भाऊराव नाईक, प्रकाश उम्रतकर, खैरुनिस्सा शेख तारीक, स्वप्ना चापळे, रमाबाई रेवते, अब्दुल मतलब, पुरूषोत्तम अंबाडरे, कृष्णा धुर्वे, ऋषिकेश सोनोने जखमी झाले. जखमींना तात्काळ बाभूळगावच्या ग्रामीण रुग्णालत उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. तर काही किरकोळ जखमींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार दिलीप झाडे, पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. पाटोळे यांनी घटनास्थळ गाठले.
बस अपघातात २६ प्रवासी जखमी
By admin | Published: July 12, 2017 12:27 AM