शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अबब ! शिक्षकांच्या बदली धोरणात २८ सुधारणा, मे महिन्यात नवी प्रक्रिया?

By अविनाश साबापुरे | Published: April 21, 2023 2:23 PM

दिव्यांग प्रमाणपत्रे, अवघड गावे, जोडीदाराच्या अंतरावर वाॅच

यवतमाळ : यंदाच्या सत्रातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच आटोपली. त्यापाठोपाठ आता बदल्यांच्या धोरणातही तब्बल २८ सुधारणा करण्यात आल्या असून लगेच मे महिन्यात पुढील शैक्षणिक सत्राच्या बदल्याही सुरू होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, ही प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत चालणार असल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

२०२२-२३ या सत्रातील बदल्या दिवाळीपासून सुरू झाल्या आणि फेब्रुवारीत संपल्या. अजून या बदल्यांच्या आदेशानुसार शिक्षकांना कार्यमुक्ती आदेश मिळालेले नाहीत. तर लगेच २०२३-२४ सत्रातील बदल्यांचेही सूतोवाच झाले आहे. राज्य शासनाने पुणे सीईओंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यासगटाने बदली धोरणात सुधारणेचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसारच नवीन सत्राच्या बदल्या होणार आहेत. या अहवालात तब्बल २८ बदल सूचविण्यात आले आहेत. त्यामुळे बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्याची शक्यता आहे. मात्र मूळ धोरणानुसार ३१ मेपूर्वी बदल्या पूर्ण होतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

या सदंर्भात जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिक्षक म्हणतात, ऑनलाइन बदली प्रक्रिया शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजे. दरवर्षी बदली प्रक्रिया करणे व ती ३१मे पूर्वी पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण ७ एप्रिल २०२१ च्या जीआरमध्ये नमूद आहे. उच्च न्यायालयाने देखील शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शैक्षणिक सत्र सुरू असताना बदली प्रक्रिया राबविल्या गेली तर शिक्षकाच्या मानसिक व कौटुंबिक स्वास्थावर वाईट परिणाम होतो. वर्षभर तो तणावात राहतो.

मागील वर्षीची बदली प्रक्रिया २०२२-२३ च्या वेळी व २०१७ मध्ये हे निदर्शनास आले. बदली संदर्भाने वेळोवेळी येणारे पत्र, सूचना, माहिती यावर त्याला सतत लक्ष ठेवावे लागते. त्याचा वाईट परिणाम शैक्षणिक कार्यावर होतो. करिता शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करावी, असे आदर्श बहुजन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वानखडे व जिल्हा सचिव सचिन तंबाखे यांनी सांगितले.

कोणत्या सुधारणा झाल्या?

- संवर्ग एक व दोनमध्ये विनंती बदलीसाठी ३ वर्ष सेवेची अट राहणार नाही. - दिव्यांगत्वाचे ऑनलाइन प्रमाणपत्र हे बदली अर्ज सादर करण्याच्या तारखेपर्यंतचेच ग्राह्य धरले जाईल.- पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होणारे शिक्षक बदली प्रक्रियेत घेतले जाणार नाही.- संवर्ग एकमध्ये होकार-नकार दिल्यावर किंवा पर्याय उपलब्ध न झाल्यास, त्यांना पुढील संवर्गात बदलीची संधी मिळेल.- संवर्ग दोनच्या शिक्षकाचा जोडीदार शिक्षणसेवक असल्यास त्यांचे शालार्थ आयडी बदली प्रणालीत नोंदवून संवर्ग दोनचा लाभ दिला जाईल.- जोडीदारांच्या शाळेच्या अंतराचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी पडताळतील.- सध्या सर्वसाधारण क्षेत्र असलेली मात्र पूर्वी अवघड क्षेत्र असलेल्या शाळेतील सेवाही ग्राह्य धरली जाईल.- बदली अधिकार प्राप्त जोडीदारांनाही बदलीपात्र संवर्गाप्रमाणे ‘पती-पत्नी’ एक युनिट मानले जाईल.- आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली असे दोन लाभ एकाच वर्षात घेता येणार नाही. 

अवघड गावातील ‘महिला-पुरुष’ भेद संपला

राज्यघटनेतील कलम १४ नुसार कोणतेही गाव हे लिंगभेदानुसार अनुकूल किंवा प्रतिकूल ठरविता येत नाही. त्यामुळे यापूर्वी २० आॅगस्ट २०१९ रोजी काही गावे महिलांसाठी प्रतिकूल ठरविणार निर्णय रद्द करण्यात आला आहे. अवघड क्षेत्रात सलग १० वर्ष व सध्याच्या शाळेत ५ वर्ष सेवा केलेले शिक्षक बदलीपात्र असतील. संवर्ग ३ मध्ये एकूण सेवाज्येष्ठतेऐवजी अवघड क्षेत्रातील सेवाज्येष्ठता विचारात घेतली जाईल. 

खो-खो थांबणार

आता बदली अधिकार पात्र शिक्षकांना निव्वळ रिक्त जागांवर तसेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्याच जागेवर बदली दिली जाणार आहे. त्यामुळे बदल्यांमधील खो-खो चा खेळ थांबणार आहे. पूर्वीच्या प्रक्रियेत बदलीपात्र शिक्षकांना मोठ्या प्रमाणात खो बसून ते विस्थापित व्हायचे. 

‘एनओसी’ची भानगड मिटली 

एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली मागताना पूर्वी जिल्हा परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य होते. मात्र आता अशा एनओसीची गरज नसल्याचे सुधारित धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रहार शिक्षक संघटनेने त्यासाठी पाठपुरावा केला होता. आंतरजिल्हा बदलीमध्ये पती-पत्नीसाठी एकाच जिल्ह्यात दोन जागा उपलब्ध नसल्यास एका जोडीदाराला शेजारचा जिल्हा दिला जाईल. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकाला १५ दिवसात कार्यमुक्त करण्याचे बंधन असेल.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीYavatmalयवतमाळ