यवतमाळ : राज्यातील २९ पोलीस उपअधीक्षकांना बढती देऊन अप्पर पोलीस अधीक्षक बनविण्यात आले आहे. यातील काही सहाय्यक पोलीस आयुक्त असून त्यांना उपायुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भुजबळ, अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षक चेतना तिडके, एटीएसचे विक्रांत देशमुख यांचा समावेश आहे. देशमुख यांना अकोल्यात अपर अधीक्षक बनविण्यात आले. बढती मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मारूती जगताप, सागर पाटील, बापू बांगर, गजानन राजमाने, शर्मीला घारगे, आनंद भोईटे, वैशाली कडुकर, दत्ता नलावडे, सचिन पांडकर, अजय देवडे, राजू भुजबळ, यशवंत काळे, डॉ. राहुल खाडे, सचिन गोरे, चेतना तिडके, खंडेराव धरणे, विशाल ठाकूर, जयश्री गायकवाड, विजयकुमार चव्हाण, दीपक गिºहे, निरज पाटील, अभिजित शिवथरे, गणेश गावडे, विजय कबाडे, सुनील लांजेवार, विक्रांत देशमुख, अतुल झेंडे, हिम्मत जाधव, दत्तात्रय कांबळे यांचा समावेश आहे.
२९ पोलीस उपअधीक्षकांना अप्पर अधीक्षकपदी बढती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 7:47 PM