शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

३0 हजार शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

By admin | Published: January 17, 2015 12:15 AM

यावर्षी अत्यल्प पावसाने वणी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. त्याला धीर देण्यासाठी शासनाने मदत घोषित केली आहे.

वणी : यावर्षी अत्यल्प पावसाने वणी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. त्याला धीर देण्यासाठी शासनाने मदत घोषित केली आहे. या मदतीपैकी पहिल्या टप्प्यात तालुक्याला ९ कोटी २७ लाख रूप्ये प्राप्त झाले आहे. हे पैसे शनिवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.वणी तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली होती. मात्र पावलसाने दगा दिल्याने बहुतांश पेरणी उलटली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल २८ हजार ९३३ हेक्टरवर दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. अखेरीस तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, ७ हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, ५ हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. मात्र पावसाअभावी यावर्षी शेतकऱ्यांचे आर्थिक अंदाजपत्रकच कोलमडले होते. यावर्षी कपाशासह सोयाबिनच्या उताऱ्यात घट आली. त्यातच लावगड खर्च भरमसाठ झाला. फवारणी, निंदण आदी खर्चाने शेतकरी बेजार झाले. कापूस वेचणीचे दरही वाढले. त्यातच दुबार-तिबार पेरणी करावी लागल्याने त्यांचे कंबरडेच मोडले. अखेरीस पीक हाती येण्याच्या वेळी पुन्हा परतीच्या पावसाने दणका दिला. त्यामुळे कपाशी आणि सोयाबिनच्या उतारीत प्रचंड घट आली. एकरी उत्पन्न घटल्याने बळीराजावर दुष्काळाचे सावट पडले. आता चहुबाजूंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंतच ही मदत दिली ािणार आहे. त्यासाठी वणी तालुक्याला ९ कोटी २७ लाख रूपये प्राप्त झाल्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले. या प्राप्त निधीतून आता शेतकऱ्यांना यादीनुसार मदत वितरीत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महसूल विभागाने प्रत्येक मंडळनिहाय शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप केले जाणार आहे. सुरूवातीला शिंदोला मंडळातील शेतकऱ्यांची यादी पाठविण्यात आली आहे. त्यात ३ हजार ४४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना १ कोटी ८१ लाखांची मदत दिली जाणार आहे. शनिवारपासून या ३ हजार ४४ श्ोतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)