लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला ३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विमुक्त जाती व भटक्या समाजाच्या विकासासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.पोहरादेवी येथे झालेल्या नंगारा वस्तुसंग्रहालय भूमिपूजन सोहळ्यात महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्यावतीने विविध २० मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते. या निवेदनातील ही पहिली मोठी मागणी शासनाने मान्य केली आहे.वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाकरिता अनुदान देण्याची मागणी शासनाने महिनाभरातच पूर्ण केली. ३०० कोटी रुपये सहायक अनुदानाशिवाय महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज मर्यादेत पाच लाखांवरून १० लाख रूपयांपर्यंत वाढ करून गट कर्ज व्याज परतावा योजनासुद्धा लागू करण्यात आली आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना या दोन्ही योजना राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विजाभज आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे.वडार व पारधी समाजासाठी विशेष योजना आणि रामोशी समाजासह इतर अतिमागास समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी विशेष योजना अशा तीन योजनांचाही यात समावेश आहे. या निर्णयामुळे राज्यातील बंजारा, भटक्या जमाती आणि विमुक्त जाती समूहातील समाजघटकांच्या विकासाची प्रक्रिया आता अधिक व्यापक व प्रभावी होण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रया ना. संजय राठोड यांनी या निर्णयानंतर दिली.
विजाभज महामंडळाला ३०० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:50 PM
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाला ३०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विमुक्त जाती व भटक्या समाजाच्या विकासासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देसंजय राठोड यांचा पाठपुरावा : पोहरादेवीत दिले होते निवेदन