लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०१ विद्यार्थ्यांना जॉब आॅफर मिळविण्यात यश आले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रातील ही मोठी उपलब्धी आहे. विविध क्षेत्रातील ४७ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष परिसर मुलाखत देण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यात आली. याचा उपयोग घेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.दरम्यान, महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचे अक्षय गावंडे व मयूर दुधे या दोन विद्यार्थ्यांची पुणे येथील सीकेडीपॅक या बहुराष्ट्रीय कंपनीसाठी निवड झाली आहे. ही कंपनी १२ देशात पॅकेजींग क्षेत्रात डिझाईनिंग, प्रोडक्शन, टेस्टींग आणि कन्सल्टन्सी या सेवा पुरविते. यापैकी प्रामुख्याने आॅटोमोटिव्ह, एव्हीएशन, इंजिनिअरिंग, एफएमसीजी, फूड व फार्मा या क्षेत्रातील पॅकेजींग डिझाईन आणि लॉजिस्टींग सोल्यूशन देण्यात ही कंपनी तज्ज्ञ आहे.या कंपनीचे प्रामुख्याने अमेरिका, जर्मनी, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, चीन, मेक्सीको, थायलंड आणि भारतात डिझाईन व प्रोडक्शन सेंटर आहेत. या कंपनीतर्फे महाविद्यालयात घेण्यात आलेल्या इन कॅम्पस ड्राईव्हमध्ये अंतिम वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्वप्रथम अॅप्टीट्यूड टेस्ट, टेक्नीकल इंटरव्ह्यू आणि एचआर इंटरव्ह्यूच्या फेऱ्या घेण्यात आल्या. यात यशस्वी ठरलेल्या अक्षय गावंडे व मयूर दुधे यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना १ जुलै रोजी कंपनीच्या पुणे प्लांटमध्ये ज्युनिअर इंजिनिअर या पदावर रुजू करून घेतले जाणार आहे. त्यांना दोन लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज घोषित केले आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कंपनीतर्फे अभिदीप रामनगरिया यांनी काम पाहिले.
‘जेडीआयईटी’च्या ३०१ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जॉब आॅफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:45 PM
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३०१ विद्यार्थ्यांना जॉब आॅफर मिळविण्यात यश आले आहे. २०१७-१८ या शैक्षणिक सत्रातील ही मोठी उपलब्धी आहे. विविध क्षेत्रातील ४७ कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष परिसर मुलाखत देण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्यात आली.
ठळक मुद्देपरिसर मुलाखती : अक्षय गावंडे व मयूर दुधे ‘सीकेडीपॅक’मध्ये