यवतमाळ - राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एकाच वेळी तब्बल ३२ कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात बुलडाणा येथील वि.पु. अडचुले यांना यवतमाळ जिल्हा परिषदेत नियुक्ती देण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (१), ४ (२) व ४ (३) मधील तरतुदीनुसार ३२ कार्यकारी अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात बुलडाणा येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे कार्यकारी अभियंता वि.पु. अडचुले यांना यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ पदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांना आठ दिवसात रुजू होऊन शासनास विनाविलंब अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यांनी पदस्थापनेत बदल करण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे आवेदन सादर केल्यास ते शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील, असा इशाराही कार्यासन अधिकारी किसनराव पलांडे यांनी दिला आहे.
बदली झालेल्यांमध्ये नवी मुंबईचे सलीम गुलाब शेख यांना राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी, सं. ज. सापटेनकर यांना विशेष प्रकल्प विभाग मुंबई, प्र. पां. बनगोसावी यांना रत्नागिरी येथून रायगड, प्र.स. व्हटकर यांना कुडाळ येथून परभणी, रा.तू. गिरीबुवा यांना रस्ते विकास महामंडळ मुंबईतून अवर सचिव मुंबई येथे बदली देण्यात आली. स.कां. गोसावी यांना रस्ते विकास महामंडळ मुंबई येथून कोकण विभागाचे सहायक मुख्य अभियंता, रा.य. पाटील यांना पुणे येथून मुंबई, सं.पां. खलाटे यांना पुणे येथून सातारा, व्ही.ह. मोरे यांना सोलापूर येथे बांधकाम क्र. १ मधून बांधकाम क्र. २ मध्ये नियुक्ती देण्यात आली. अ.शा. ढेपे यांना सोलापूर येथून अकलूज, य.गौ. लवटे यांना सोलापूर येथून सातारा, सं.रा. पाटील यांना सातारा येथून पुणे, प्र.द. कदम यांना सातारा येथून सोलापूर, वि.ग. महाले यांना नाशिक येथून जळगाव, शं.वि. तोटावार यांना भोकर येथून ठाणे येथे बदली देण्यात आली.
अ.ज. भोसले यांना लातूर येथून नांदेड, सं.वि. कुलकर्णी यांना उस्मानाबाद येथून सोलापूर, रा.भा. झालपे यांना अकोला येथून लातूर येथे नियुक्ती देण्यात आली. चं.व. शिखरे यांना बुलडाणा येथून नागपूर, अ.यो. मेश्राम यांना नागपूर येथून गडचिरोली, पी.एन. पागृत यांना नागपूर सुधार प्रन्यास येथून नागपूरच्याच महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठात नियुक्ती देण्यात आली. तु.अ. बुरुड यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेतून कोल्हापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात, जे.आर. विभुते यांना पुणे येथून सिंधुदुर्ग, अ.म. जवंजाळ यांना अमरावती येथून मुंबई येथे, जे.पी. पाटील यांना पुण्यातच नियुक्ती देण्यात आली. आर.डी. मिसाळ यांची मुंबई येथून उस्मानाबाद, अ.रा. भास्करवार यांची नागपूर येथून चंद्रपूर तर वर्षा घुगरी यांची धुळे महानगरपालिकेतून धुळे जिल्हा परिषदेत बदली करण्यात आली.
यवतमाळच्या दोघांची बदली
या सार्वजनिक बदल्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुसद येथील कार्यकारी अभियंता संजय धोत्रे यांची सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ येथे बदली करण्यात आली. यवतमाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता ए.ल. लाखाणी यांची पुसद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून बदली करण्यात आली. यवतमाळ जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग क्र. १ च्या रिक्त असलेल्या कार्यकारी अभियंतापदी बुलडाणा येथील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेचे व्ही.पु. अडचुले यांची बदली करण्यात आली आहे.