लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील झरी येथे गेल्या १५ दिवसात ३५ जनावरांचा विविध आजाराने मृत्यू झाला आहे . यामुळे शेतकऱयांच्या चिंतेत वाढ झाली आहे . गेल्या काही दिवसांपासून शेतकऱयांच्या गाय, बैल आणि इतर जनावरांचे चारा खाणे बंद झाले होते . तसेच मलाद्वारे रक्तस्त्राव होत असल्याने जनावरांचा मृत्यू झाला आहे . पशुवैद्यकिय अधिकाऱयांनी उपचारही केले . पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही . उलट आजारी जनावरांचा मृत्यू झाला . प्रशासनाने आजाराचे निदान करावयाचे आदेश दिले आहेत . जर वेळीच व्यवस्थित उपचार झाले असते तर या जनावरांचे प्राण वाचले असते . प्रशासनाने कुठेतरी निष्काळजीपणा केल्याचा आरोप शेतकरी करीत आहे .