लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या श्रमिकांना स्वगृही पाठविण्यासाठी ‘लालपरी’ला ३७ लाख ३५ हजार रुपये एवढा खर्च आला आहे. १०० बसेसच्या माध्यमातून एक हजार ९०० मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर पोहोचविण्याची जबाबदारी यवतमाळ विभागाने पार पाडली आहे.लॉकडाऊन काळात परराज्यातील नागरिक त्यांच्या घरी, राज्यात परतु इच्छित होते. त्यांना सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही उपलब्ध करून देण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. यवतमाळ विभागानेही यात आपला वाटा उचलला. करारावर बसेस देण्यात आल्या. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मजुरांना सोडण्यासाठी १०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. या मजुरांना सोडण्यासाठी ३७ लाख ३५ हजार रुपये एवढा खर्च यवतमाळ विभागाला आला. अमरावती विभागातून अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ येथून बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये वाढ नाहीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचे भाडे वाढल्याच्या चर्चेला अलीकडे पेव फुटले आहे. या गावाचे भाडे इतके, त्या गावाचे तितके भाडे झाले अशी हवा पसरली आहे. मात्र कुठल्याही गावासाठी किंवा बसेसकरिता भाडेवाढ करण्यात आली नाही, असे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी सुरू झालेल्या बससेवेचा सोशल डिस्टन्सिंग पाळून लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
श्रमिकांना स्वगृही पाठविण्यासाठी ३७ लाख खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 5:00 AM
लॉकडाऊन काळात परराज्यातील नागरिक त्यांच्या घरी, राज्यात परतु इच्छित होते. त्यांना सुविधा मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही उपलब्ध करून देण्यात आल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. यवतमाळ विभागानेही यात आपला वाटा उचलला. करारावर बसेस देण्यात आल्या.
ठळक मुद्देयवतमाळ विभागातून १०० बसेस : ‘लालपरी’ने दोन हजार मजुरांना सोडले