लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : तालुक्यातील पडसा येथे बौद्ध विवाह मेळाव्यात ६८ आंतरजातीय जोडप्यांसह एकूण ३९५ जोडपी विवाहबद्ध झाली.महानंदा प्रतिष्ठानद्वारे २९ मे रोजी पडसा येथे २४ व्या बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन माहूरचे नगराध्यक्ष फिरोझ दोसाणी यांनी केले. अध्यक्षस्थानी अॅड.हरदडकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून मेघराज जाधव, अनंतराव केशवे, बंडू पाटील भुसारे, कादर दोसाणी, आकाश कांबळे, दीपक कांबळे, डॉ.रमेश गावंडे उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजक प्रकाश गायकवाड यांच्या पुढाकारातून गेल्या २४ वर्षांपासून पडसा येथे बौद्ध तथा अन्य धर्माच्या बांधवांचा वेळ, पैसा व श्रम वाचावेत तथा त्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळावा, या हेतूने दरवर्षी विवाह मेळावा घेण्यात येतो.या विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रकाश गायकवाड यांच्यासह कुमार कांबळे, उत्तम मुनेश्वर, प्रदीप भगत, अरुण शेंडे, मारोती कांबळे आदींनी सहकार्य केले. एखाद्या विवाह मेळाव्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने जोडपी विवाहबद्द झाली आहे. विशेष म्हणजे त्यात ६८ आंतरजातीय जोडपी असल्याने हा मेळावा माहूर तालुक्यातच नव्हे, तर नांदेड जिल्ह्यात लक्षवेधी ठरला.
पडसा येथे ३९५ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:42 PM
तालुक्यातील पडसा येथे बौद्ध विवाह मेळाव्यात ६८ आंतरजातीय जोडप्यांसह एकूण ३९५ जोडपी विवाहबद्ध झाली. महानंदा प्रतिष्ठानद्वारे २९ मे रोजी पडसा येथे २४ व्या बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देविवाह मेळावा : आंतरजातीय ६८ विवाह