जमीन-आसमानचा फरक : कर्मचाऱ्यांची दररोज दिवाळी, कास्तकारांचे वर्षभर हालचज्ञानेश्वर मुंदे यवतमाळशेतीमाल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा गत ४२ वर्षांचा आलेख बघितला तर जमीन-आसमानाचा फरक दिसून येतो. ५०० रुपये क्ंिवटलच्या कापसाने चार हजारपर्यंत मजल मारली. तर प्राध्यापकांचा पगार ६०० रुपयांवरून सव्वालाखांवर जाऊन पोहोचला आहे. ४२ वर्षात कापसाच्या दरात आठपट आणि प्राध्यापकांच्या वेतनात तब्बल २०८ पट वाढ झाली. शेतात रात्रंदिवस मेहनत करूनही काहीच हाती लागत नाही. उलट कर्मचाऱ्यांची दररोज दिवाळी असते.महागाई दर दिवशी वाढत असून प्रत्येक वस्तूंचे दर आकाशाला भिडत आहे. या तुलनेत शेती मालाचे दर मात्र जेमतेमच वाढत आहे. उलट शेती लागवडीसाठी खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. १९७३ ते २०१५ या ४२ वर्षात शेतमालाचे भाव, पक्क्या वस्तूंचे भाव आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर शेत मालाला कवडीमोल भावच मिळत असल्याचे दिसत आहे. ४२ वर्षापूर्वी कापसाचा एक क्ंिवटलचा दर आणि प्राध्यापकांच्या वेतनात केवळ १०० रुपयांचा फरक होता. कापसाला ५०० रुपये प्रति क्ंिवटल तर प्राध्यापकाला ६०० रुपये दरमहा वेतन मिळत होते. सध्या कापसाचा भाव चार हजार रुपये प्रति क्ंिवटल आणि प्राध्यापकांचा पगार सव्वा लाखांच्या आसपास आहे. ४२ वर्षात कापूस केवळ ८.१ पट तर तर प्राध्यापकांचा पगार तब्बल २०८ पट वाढला आहे. १९७३ साली ज्वारी २०० रुपये प्रति क्ंिवटल, गहू ४०० रुपये, तांदूळ ६०० रुपये प्रति क्ंिवटल होता. तर पेट्रोल ३ रुपये लिटर, डिझेल २ रुपये लिटर आणि सोने ४०० रुपये तोळा होते. मजुराला दिवसाकाठी पाच रुपये मजुरी मिळत होती. याच काळात शिपायाला दरमहा १७५ रुपये वेतन मिळत होते. तर कनिष्ठ लिपिकाचा पगार २२५ रुपये होता. महागाईचा आलेख वाढताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढत गेले. साधा शिपाईही १५ हजार रुपये महिना वेतन घेतो. सोने २७ हजार रुपये तोळ्यावर गेले आहे. तर पेट्रोल ६७ रुपये लिटर आणि डिझेल ५४ रुपये लिटर झाले आहे. मजुरीचे दर २०० रुपये प्रति दिवस झाले आहे. त्या तुलनेत शेती माल मात्र आहे त्या स्थितीतच दिसत आहे. गत काही वर्षात दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. ही तफावत दूर होण्याचे कोणतीही चिन्ह दिसत नाही. उलट शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याची घोषणा केली. यात पुन्हा पगारात प्रचंड वाढ होणार आहे. उलट शेतमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहे. एकेकाळी उत्तम मानली जाणारी शेती आता कनिष्ठ झाली असून शेतकऱ्यांची मुलेही नोकरीसाठी धडपत करीत आहे. शेती विकून नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. याचे कारण म्हणजे गत काही वर्षात पगारात झालेली भरघोस वाढ होय. एकीकडे महागाई वाढत असताना कापसाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे दुष्काळाची छायाही कायम असते.
४२ वर्षांत कापूस आठ अन् पगारात २०० पट वाढ
By admin | Published: November 18, 2015 2:34 AM