शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

महिलांवरील अत्याचाराला ब्रेक कधी?, राज्यात ४७ हजार गुन्ह्यांची नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 8:52 PM

आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव : बाहेरच नव्हे तर घराची चाैकटही असुरक्षित

सूरज पाटील, यवतमाळ : महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला आळा बसावा, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कायदे कठाेर करण्यात आले. मात्र, तरीही अत्याचाराच्या घटनांचा आलेख हा वाढतच चालला आहे. २०२३ मध्ये राज्यात महिला अत्याचाराचे ४७ हजार ३८१ गुन्हे घडले असून, त्याची नाेंद पाेलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यात बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, पतीसह नातेवाइकांकडून झालेले क्रूर कृत्य, विनयभंग, अनैतिक व्यापार आदींचा समावेश आहे. ही धक्कादायक आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून समाेर आली आहे.

पूर्वी जनजागृतीअभावी व बदनामीच्या भीतीने अत्याचार सहन केला जात होता. मात्र, वाढत्या जनजागृतीमुळे अल्पवयीन मुलींचे पालक व महिलादेखील तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. महिलांवर केवळ बाहेरच अत्याचार होतात, असे नाही तर घराच्या चौकटीतही महिला सुरक्षित नाहीत. जवळच्या नातेवाइकांकडून व पतीकडूनही अत्याचार केला जातो. २०२१ मध्ये राज्यात महिला अत्याचाराचे ३९ हजार ५२६ गुन्हे नोंदविण्यात आले हाेते. २०२२ मध्ये ४५ हजार ३३१ तर, २०२३ मध्ये ४७ हजार ३८१ गुन्ह्याची नाेंद आहे. २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये गुन्हे दाेन हजार ५०ने वाढले आहेत. बलात्काराचे ७,५२१, अपहरण व पळवून नेल्याचे ९,६९८, विनयभंग १७,२८१ आणि पती व नातेवाइकांकडून हाेणाऱ्या अत्याचाराच्या ११,२२६ घटना घडल्या आहेत.महिला व मुलींवर जवळच्या नातेवाइकांकडूनही अत्याचार केला जाताे. अशा घटनांमुळे पवित्र नात्यालाही काळिमा फासला जात आहे, ही सर्वाधिक चिंताजनक बाब आहे. महिलांवर हाेणाऱ्या अत्याचाराला ब्रेक लागणार तरी कधी?, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.अशी आहे गुन्ह्यांची नाेंद आकडेवारी

गुन्हे - २०२२ - २०२३बलात्कार - ७,०८४ - ७,५२१अपहरण - ९,२९७ - ९,६९८हुंडाबळी - १८० - १६९पती व नातेवाईक - ११,३६७ - ११,२२६विनयभंग - १६,०८३ - १७,२८१अनैतिक व्यापार - ६५ - १७४इतर - १,२५५ - १,३१२

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी