शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नगरपंचायतीत 47 हजार मतदार उद्या बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 5:00 AM

नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपंचायतींची निवडणूक रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सहा नगरपंचायतींमधून ८४ जागांसाठी ४३५ उमेदवार आपले नशीब अजमावीत आहे. ढाणकी नगरपंचायतीच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. जाहीर प्रचार रविवारी सायंकाळीच थांबला आहे. मंगळवार, २१ डिसेंबर रोजी मतदार आपला हक्क बजावणार आहे. तब्बल ४७ हजार ६९८ मतदार आपला हक्क बजावणार आहे. नगरपंचायत निवडणुकीत संभाव्य विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे रंगत आली आहे. राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही कडवे आव्हान उभे केले आहे. आता शेवटची रात्र वैऱ्याची समजून प्रत्येक जण खडा पहारा देत आहे. आर्थिक उलाढालसुद्धा याच रात्री केली जाणार आहे. प्रभागात मोजकी मतदार संख्या असल्याने प्रत्येकच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. चेक मेटची पॉलिसी शेवटच्या रात्री राबविली जाणार आहे. बाभूळगाव नगरपंचायतीत पाच हजार ७० मतदार असून पुरुष मतदार २५४४ आहेत. महिला मतदार २५२६ आहेत. सर्वाधिक मतदार संख्या ही कळंब नगरपंचायतीची आहे. तेथे १४ हजार २०६ एकूण मतदार आहेत. त्यात पुरुष ७०८८, महिला ७११८ आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदार संख्या राळेगाव येथे १२ हजार १२७ इतकी आहे. त्यात पुरुष ६६२५, तर ६५०२ महिला आहेत. सर्वांत कमी मतदार संख्या झरी  येथे २२६८ आहे. पुरुष १ हजार १५२ तर महिला १ हजार ११६ आहे. महागाव नगरपंचायतीमध्ये सात हजार ५२० मतदार असून पुरुष तीन हजार ९०, महिला तीन हजार ६१९, तर तृतीयपंथी एक आहे. मारेगाव येथे ६५०७ मतदार आहे. त्यात पुरुष तीन हजार २५१ तर महिला मतदार तीन हजार २५६ आहेत. प्रत्येक मतदाराचे मतदान झालेच पाहिजे यासाठी उमेदवारच धडपड करीत आहे. मतदानाची टक्केवारीही ८० च्या पुढे राहण्याचा अंदाज आहे. 

खर्च मर्यादा दीड लाखाची, शेवटची रात्र बाकी- नगरपंचायतीच्या एका उमेदवाराला प्रचार-प्रसारावर खर्च मर्यादा केवळ दीड लाखाची आहे. अनेकांनी हे बजेट कधीच पूर्ण केले आहे. आता तर शेवटची रात्री बाकी आहे. शेवटच्या रात्रीतच पैशाचा धुराळा केला जातो. रात्रीतून बाजी पलटविण्यासाठी आर्थिक सक्षमताच दाखविली जाते. त्यामुळे दीड लाखाची खर्च मर्यादा खरोखरच पाळली जाते का, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक