लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढीव सिंचनासाठी मनरेगातून ४८०० सिंचन विहिरींना अखेर मंजुरी मिळाली आहे. यातून प्रत्येक तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांना विहीर मिळणार आहे.तत्कालीन आघाडी सरकारने प्र्रत्येक तालुक्यासाठी प्रत्येकी ३०० प्रमाणे जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वाढीव ४८०० सिंचन विहिरींची घोषणा केली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून प्रत्यक्षात विहिरी मंजूर झाल्या नव्हत्या. काही शेतकऱ्यांनी प्रकरण न्यायालयात नेले होते. यानंतर न्यायालयाने या वाढीव विहिरींसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आदेश दिले. त्यात जिल्ह्यातून तब्बल २६ हजार ५१८ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. यातून शुक्रवारी सोडत पद्धतीने चार हजार ८०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.या ४८०० सिंचन विहिरींपैकी ३१४ विहिरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार आहे. आठ एकरपर्यंत शेती असलेल्या ७५६ मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ मिळणार आहे. आठ ते १६ एकरपर्यंत शेती असलेल्या २०४ शेतकऱ्यांना विहिरी मिळणार आहे. याशिवाय खुल्या प्रवर्गातील आठ एकरपर्यंत शेती असलेल्या १५१२, तर १६ एकरपर्यंत शेती असलेलया ४८० शेतकरी लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील १२६९ गावांतील हे सर्व लाभार्थी आहेत. या विहीर बांधकामासाठी प्रत्येकी अडीच लाखांचा निधी मिळणार आहे. सिंचनातून समृद्धीकडे जाण्याचा हा प्रयत्न असून शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.उन्हाळ्यापूर्वी खोदकामाची अपेक्षाया विहिरी अखेर मंजूर झाल्या. संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष खोदकामाची प्रतीक्षा आहे. यावर्षी अल्प पावसामुळे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यामुळे त्यांना किमान पुढील वर्षी खरिपातील पिकांच्या ओलितासाठी विहिरींची तातडीने गरज आहे. त्यासाठी उन्हाळ्यापूर्वी विहिरींचे खोदकाम पूर्ण पूर्ण होणे गरजेचे आहे.
मनरेगातून ४८०० विहिरी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 9:33 PM
वाढीव सिंचनासाठी मनरेगातून ४८०० सिंचन विहिरींना अखेर मंजुरी मिळाली आहे. यातून प्रत्येक तालुक्यातील ३०० शेतकऱ्यांना विहीर मिळणार आहे.
ठळक मुद्दे१२६९ गावांचा समावेश : प्रत्येकी अडीच लाखांचा निधी