शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

४८५ कोटींच्या रस्त्यांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:00 PM

केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ४८५ कोटी ६७ लक्ष रुपये किंमतीच्या दहा नव्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या रस्त्यांची कामे केली जाणार आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम : केंद्रीय रस्ते निधीतून १८३ किलोमीटरचे रस्ते

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) एकट्या यवतमाळ जिल्ह्यासाठी ४८५ कोटी ६७ लक्ष रुपये किंमतीच्या दहा नव्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत या रस्त्यांची कामे केली जाणार आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नव्या रस्ते-पुलांचे बांधकाम, विस्तारिकरण, रुंदीकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केले होते. त्यापैकी दहा कामांना केंद्रीय रस्ते निधीतून मंजुरी देण्यात आली. या कामांचे बजेट ४८५ कोटी ७६ लाख रुपयांची आहे. त्यामध्ये वाशिम-पुसद-गुंज-महागाव ३८ कोटी, उमरखेड-चुरमुडा-दगडधर-चिल्ली २५ कोटी, बोदेगाव ते धामणगावदेव २० कोटी, घाटंजी ते पारवा ६५ कोटी, बोरी-पाटण-मुकुटबन ८४ कोटी एक लाख, वणी-कायर मार्ग ५८ कोटी ७५ लाख, चामरगाव-शिरपूर-कळमना-चंद्रपूर ५५ कोटी, खैरी-मार्डी-नांदेपरा-वणी ५४ कोटी, पारवा ते पिंपळखुटी ४९ कोटी १९ लाख आणि यवतमाळ बसस्थानक ते नागपूर बायपास मार्ग ३९ कोटी ७२ लाख रुपये या कामांचा समावेश आहे. आणखीही काही कामे प्रस्तावित आहेत. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळाली नाही. जिल्ह्यात अनेक मार्गांवर नव्या पुलांची, रस्ता रुंदीकरणाची आवश्यकता आहे. ही कामे मार्गी लावण्याचा प्रस्ताव आहे.तेलंगणा-मराठवाडापर्यंत निर्माण होणार कनेक्टिव्हिटीसीआरएफमधून मंजूर झालेल्या या दहा कामांमुळे जिल्ह्यात आणखी चांगली कनेक्टीव्हीटी निर्माण होणार आहे. लवकरच या कामांच्या निविदा काढल्या जाऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याचेही सांगण्यात आले. या कामांच्या माध्यमातून प्रमुख व इतर जिल्हा मार्गांचे विस्तारीकरण करून ते राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गांशी जोडले जाणार आहेत. यवतमाळ शहरातही बसस्थानक ते नागपूर बायपासपर्यंत रस्त्याचे काम केले जाईल. खैरी ते वणी या मार्गाच्या कामामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वडकीवरून थेट चंद्रपूरकडे जाणाऱ्या वणी बायपासवर जोडले जाणार आहे. अशीच कनेक्टीव्हीटी लगतच्या तेलंगणा राज्यासह मराठवाड्यासाठीही निर्माण केली जाणार आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग