मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे ५० लाख रुपयांच्यावर चुकारे अद्याप करण्यात आले नाहीत. अनेक दिवसांपासून मालाची रक्कम अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.नाफेडला शेतमालाची विक्री केल्यानंतर चोवीस तासाच्या आत चुकारा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु अनेक महिने झाले तरी शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पैसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील हंगामात दारव्हा येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर तालुक्यातील ६ हजार नऊशे शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यामधील १ हजार २५७ शेतकऱ्यांनी १९ हजार तीनशे ४८ क्विंटल तुरीची विक्री केली होती. तर २५७ शेतकऱ्यांनी ३ हजार आठशे ९५ क्विंटल हरभरा विकला. यामधील २५६ शेतकऱ्यांच्या खात्यात हरभऱ्याचे १ कोटी ७१ लाख ३८हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. परंतु तुरीचे मात्र २० नोव्हेंबर पर्यंत ५० शेतकऱ्यांचे १ हजार ५५ क्विंटलचे ५६ लाख ९७ हजार रुपये मिळाले नाही. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतमालाचे हमीभाव, योग्य मोजमाप व विकलेल्या मलापोटी २४ तासात चुकारा देण्याची घोषणा या सर्व बाबींमुळे शासनाच्या वतीने नाफेडमार्फत उघडण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्राकडे मोठ्या संख्येने शेतकरी वळले आहे. परंतु शेतमाल विकल्यानंतर वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केल्या जात आहे. २४ तास सोडा अनेक महिने होऊन सुद्धा पैसे न मिळाल्याच्या तक्रारी असून त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. हातात पैसे न मिळाल्याने या शेतकऱ्यांना दिवाळीत चणचण भासली. त्याचबरोबर सध्या रब्बी हंगामासाठी आवश्यकता असतांना शेतमाल विकून सुद्धा पैसे मिळाले नाही. त्यामुळे आता आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल उपस्थित होत असून तात्काळ बँक खात्यात पैसे जमा करण्याची मागणी आहे.पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेअनेक महिन्यांपासून तुरीचे पैसे अडकले असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाकडे चौकशी केली असता नाफेडला विकलेल्या हरभऱ्याचे पैसे एक वगळता सर्वांना मिळाले. तर तुरीची रक्कम सुद्धा दररोज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याची माहिती देण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० लाख रुपये अडकले; तुरीच्या चुकाऱ्याला विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:41 AM
दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे ५० लाख रुपयांच्यावर चुकारे अद्याप करण्यात आले नाहीत. अनेक दिवसांपासून मालाची रक्कम अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील शेतकरी त्रस्त