लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासदार व आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतून पन्नास टक्के निधी शासनाने कोरोनाच्या संकटासाठी थेट कपात करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे. त्या निधीतून शासनाने या आजारासाठी लढण्याकरिता नियोजन करावे अशी अपेक्षा देवानंद पवार यांनी व्यक्त केली आहे.दरवर्षी शासनस्तरावरून खासदार व आमदारांना स्थानिक विकासनिधी दिला जातो. त्या निधीतून आपापल्या भागातील विकासकामे करायची असतात. हा निधी जनतेच्या पैशातूनच लोकप्रतिनिधींना दिल्या जाते. कोरोनाचे संकट अतिशय भयंकर आहे, संपूर्ण जग या संकटाचा सामना करत आहे. अशा प्रसंगी मानवतेचा परिचय देण्याची सर्वांची भूमिका असली पाहिजे. खासदार आमदारांना त्यांचा स्थानिक विकासनिधी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी वापरण्याची केंद्र व राज्य सरकारने मुभा दिली आहे.शासनाने खासदारांचा निधी केंद्र स्तरावर व आमदारांचा निधी राज्यस्तरावर थेट उपयोगात आणावा अथवा हे लोकप्रतिनिधी ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना व नोडल अधिकाºयांना हा निधी कपात करून तो खर्च करण्याचा अधिकार शासनाने द्यावा त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशींची अट ठेऊ नये अशी मागणीही पवार यांनी केली आहे.
खासदार आमदारांचा ५० टक्के निधी शासनस्तरावरूनच कपात करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 11:11 AM
खासदार व आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतून पन्नास टक्के निधी शासनाने कोरोनाच्या संकटासाठी थेट कपात करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे.
ठळक मुद्देसोशल मीडियावरील राजकीय टीका टाळण्याचेही आवाहन