शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

५१ फ्लेमिंगोंचा सायखेड्यात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 9:07 PM

अत्यंत देखणा फ्लेमिंगो पक्षी भारतात सहसा आढळत नाही. तो पाहता यावा म्हणून मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात चार-दोन फ्लेमिंगो आणण्यात आले. त्यावर राजकारणही तापले. पण यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा धरणावर सध्या ५१ फ्लेमिंगोंचा थवा मुक्कामी आलाय.

ठळक मुद्देजिल्ह्याला अप्रूप : ‘फ्लेमिंगो टुरिझम’मधून स्थानिकांना मिळाला रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अत्यंत देखणा फ्लेमिंगो पक्षी भारतात सहसा आढळत नाही. तो पाहता यावा म्हणून मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात चार-दोन फ्लेमिंगो आणण्यात आले. त्यावर राजकारणही तापले. पण यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा धरणावर सध्या ५१ फ्लेमिंगोंचा थवा मुक्कामी आलाय. विशेष म्हणजे, या पक्ष्यांमुळे स्थानिकांना चांगला रोजगारही मिळतोय.पांढरकवडा येथील मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी मंगळवारी सकाळी हे ५१ फ्लेमिंगो कॅमेराबद्ध करून त्यांची नोंद घेतली आहे. जिल्ह्यातच नव्हेतर महाराष्ट्रात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो येणे दुर्मिळ आहे. काही ठिकाणी हे स्थलांतरित पक्षी दिसले तरी ते फार तर एखाद दोन दिवस थांबतात. मात्र, सायखेडा धरण परिसरात ते दरवर्षी एप्रिलच्या सुमारास येऊन एक ते दीड महिना मुक्काम ठोकतात, अशी माहिती डॉ. विराणी यांनी दिली.२०१५ मध्ये या परिसरात १३ तर २०१६ मध्ये ३२ फ्लेमिंगोंची नोंद विराणी यांनी घेतली होती. मध्यंतरीच्या काळात हे पक्षी आले नाही. तर आता २०१९ च्या एप्रिलमध्ये मात्र ५१ इतक्या विक्रमी संख्येत येऊन फ्लेमिंगोंनी आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. या फ्लेमिंगोची स्थानिक रहिवासीही व्यवस्थित काळजी घेतात. शिवाय, धरण परिसरात गुरे चारणारे, मासेमारी करणारे यांच्याकडून या पक्ष्यांना त्रास होऊ नये, याकरिता पांढरकवडा वनविभागातर्फे दोन कर्मचारी पाळत ठेवत असतात.हजारोंची मिळकतसायखेडा धरणावर दरवर्षी येणाऱ्या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्थानिक मासेमारांच्या मदतीनेच ‘फ्लेमिंगो टुरिझम’ ही संकल्पना राबविली जाते. २०१६ मध्ये आलेल्या ३२ फ्लेमिंगोमुळे ३० हजारांची मिळकत झाली होती. तर यंदा ५१ फ्लेमिंगोमुळे कमाई वाढण्याचे संकेत आहे. मासेमार आपल्या बोटीतून ३०० रुपयांच्या मोबदल्यात पर्यटकांना धरणात घेऊन जातात. एका वेळी दोघांनाच नेले जाते. ३०० फूट अंतरावरून पर्यटक फ्लेमिंगो बघू शकतात, त्यांचे छायाचित्र घेऊ शकतात. ‘फ्लेमिंगो टुरिझम’मुळे मिळकत होत असल्याने स्थानिक नागरिकही या पक्ष्यांच्या संरक्षणासाठी काळजी घेतात, असे डॉ. रमझान विराणी यांनी सांगितले.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य