लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत मडकोना (ता.यवतमाळ) ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पाच लाखांचा पुरस्कार पटकाविला. वणीतील सावंगी ग्रामपंचायत दुसऱ्या तर, राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. यासोबच जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार आणि पंचायत समितीस्तरावर ४८ ग्रामपंचायतीला २८ लाखांचे पुरस्कार पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार चौधर, जिल्हा परिषद सदस्या रेणु संजय शिंदे, उषा भोयर, पुसद पंचायत समितीचे सभापती देवराव मस्के, आर्णी पंचायत समितीचे सभापती श्रीकांत जयस्वाल आदी यावेळी निमंत्रित होते. यावेळी विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सन २०१७-२०१८ मधील स्पर्धेत निवड झालेल्या ग्रामपंचायतींना विभागस्तरावरील स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विभागस्तरावर निवड झाल्यास राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे.पांढरकवडा तालुक्यातील सोनुर्ली ग्रामपंचायतीने कुटुंब कल्याण कार्यक्रमात जिल्ह्यात उत्कृष्ट काम केले. पुसद पंचायत समितीमधील हर्षी ग्रामपंचायतीने पाणी व सांडपाण्याच्या योग्य नियोजन केले. दारव्हा पंचायत समितीच्या बोरी बु. ग्रामपंचायतीने सामाजिक एकतेमध्ये उत्कृष्ट कार्य केले. या ग्रामपंचायतीना प्रत्येकी २५ हजारांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.यावेळी महेंद्र गुल्हाने, वंदना ढवळे, मंगला सराफ, भारत चव्हाण, पुंजाजी देशमुख, प्रशांत भवरे यांच्यासह स्वच्छता विभागाची चमू उपस्थित होती.पुरस्काराने सन्मानित ग्रामपंचायतीपंचायत समितीस्तरावर ४८ ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. यवतमाळ - मडकोना, चापडोह, बेचखेडा, बाभूळगाव - माऊली गव्हाळी, वेणी, पहूर, कळंब : वंडली, पार्डी. सा, पार्डी. न, राळेगाव - रावेरी, आष्टा, खडकी, घाटंजी - सायफळ, सायतखर्डा, माणूसधरी, पांढरकवडा - कोठोडा, सोनुर्ली, लिंगटी, मारेगाव - किन्हाळा, देव्हाळा, सराटी, झरी - हिवरा बारसा, मांगली, दिग्रस, वणी - नायगाव, सावंगी, चिखली, नेर - पांढरी, शिरसगाव, टाकळी, दारव्हा - बोरी. खु, बोरी. बु, उमरी ई, आर्णी - चिखली, परसोडा, गणगाव, दिग्रस - वाई मेंढी, महागाव, चिरकुटा, पुसद - खर्षी, हर्षी, हनवतखेड, उमरखेड - ब्राम्हणगाव, दिघडी, नारळी, महागाव - सवना, बिजोरा, करंजखेड या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा एक लाखांचा, द्वितीय क्रमांकाचा ५० हजाराचा तर तृतीय क्रमांकाचा २५ हजाराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
५४ ग्रामपंचायतींचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 9:55 PM
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत मडकोना (ता.यवतमाळ) ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पाच लाखांचा पुरस्कार पटकाविला. वणीतील सावंगी ग्रामपंचायत दुसऱ्या तर, राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला. यासोबच जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार आणि पंचायत समितीस्तरावर ४८ ग्रामपंचायतीला २८ लाखांचे पुरस्कार पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले.
ठळक मुद्देग्रामस्वच्छता अभियान : मडकोना पहिले, सोनुर्ली, हर्षी, बोरीला विशेष पुरस्कार