शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

५४ हजार विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 5:38 PM

एकही मूल शाळाबाह्य राहता कामा नये, असे निर्देश द्यायचे आणि दुसरीकडे शाळेतील मूल शाळाबाह्य झाले तरी तमा बाळगायची नाही, असा उफराटा कारभार शिक्षण विभागाने सुरू केला आहे.

अविनाश साबापुरे 

यवतमाळ : एकही मूल शाळाबाह्य राहता कामा नये, असे निर्देश द्यायचे आणि दुसरीकडे शाळेतील मूल शाळाबाह्य झाले तरी तमा बाळगायची नाही, असा उफराटा कारभार शिक्षण विभागाने सुरू केला आहे. गोरगरीब पालकांसोबत त्यांच्या मुलांनीही रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले आहे. मात्र हंगामी वसतिगृहांना मंजुरी देण्यासाठी महिनाभर विलंब झाल्याने २३ जिल्हा परिषदांच्या शाळांना पटसंख्या टिकविणे अवघड बनले आहे. ५४ हजार विद्यार्थी स्थलांतरामुळे शाळाबाह्य होण्याचा धोका या जिल्हा परिषदांनीच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या नजरेस आणून दिला आहे. 

यवतमाळसह २३ जिल्ह्यातील मजूरवर्ग दरवर्षी दिवाळीच्या महिनाभरापूर्वी रोजगारासाठी परजिल्ह्यात, परराज्यात स्थलांतर करतात. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही गेल्यास मुलांचे शिक्षण तुटू शकते. यावर मात करण्यासाठी दरवर्षी १ आॅक्टोबरपासून संबंधित जिल्हा परिषद शाळांमध्ये हंगामी वसतिगृह सुरू करण्यास मंजुरी दिली जाते. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वीपासूनच शाळांकडून संभाव्य स्थलांतराचा सर्वे मागविला जातो. यंदा आॅक्टोबरच्याही पूर्वी मजूरवर्गाचे स्थालांतर सुरू झाले. नोव्हेंबर उजाडला तरी हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाही. विशेष म्हणजे, ५४ हजार विद्यार्थी स्थलांतरित होतील, असा सर्वे शाळांकडून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला कळवूनही वसतिगृहांना अत्यंत विलंबाने मंजुरी देण्यात आली आहे. 

२३ जिल्ह्यांसाठी ४५ कोटी ९२ लाख ३० हजार रुपयांचा निधी परिषदेने मंजूर केला आहे. मात्र या कोट्यवधी रुपयांच्या मंजुरीपूर्वीच अनेक विद्यार्थी पालकांसोबत परगावी निघून गेले आहेत. त्यातही आता केवळ मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषदांनी आता शाळांकडून वसतिगृहांसाठी प्रस्ताव मागविले आहेत. विहित नमुन्यातील हे प्रस्ताव प्राप्त झाल्यावरच प्रत्यक्ष वसतिगृह सुरू होतील. दरम्यान दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्या आहे. त्यामुळे शाळेत हंगामी वसतिगृह सुरू होण्यासाठी आणखी महिनाभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत किती विद्यार्थी वसतिगृहासाठी पालकांना सोडून गावात थांबतील, याबाबत शंका उपस्थित होत आहे.हंगामी वसतिगृहासाठी पुढील वर्षी डीबीटी

प्रति विद्यार्थी ८५०० रुपयांचा निधी सहा महिन्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना देऊन शाळांमध्ये हंगामी वसतिगृह सुरू केले जाणार आहे. मात्र, पुढील वर्षी हंगामी वसतिगृह योजनेचे पैसे थेट विद्यार्थ्यांना (डीबीटी) दिले जाणार आहे. यंदा प्रायोगिक तत्वावर शिरुर तालुक्यात (जि. बीड) ही डीबीटी पद्धत राबविण्यात येणार आहे. 

स्थलांतर करणारे संभाव्य विद्यार्थी

अहमदनगर ६९२, अमरावती २३६०, औरंगाबाद २१०, बीड ३३९३५, बुलडाणा ४३, धुळे ६८, गडचिरोली ३५६, हिंगोली २६४, जळगाव ३२९, जालना २९९९, लातूर ७१८, नांदेड १८२७, नंदूरबार ४७३, नाशिक १९६६, परभणी १८५०, पालघर ४७५, रायगड २८८, सांगली ४५०, सातारा १७०, सिंधुदुर्ग ६३, सोलापूर ५९६, वाशीम ५६, यवतमाळ १४५४ एकूण ५४०२७

टॅग्स :YavatmalयवतमाळEducationशिक्षणStudentविद्यार्थी