शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दिलासादायक! यवतमाळमध्ये दोन दिवसांत 548 जणांची कोरोनावर मात; 354 नवे कोरोनाबाधित आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 9:00 PM

बरे होऊन घरी परतलेले कोरोनाबाधित रुग्ण येथील वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, तसेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये भरती होते. रुग्णालयातून गुरुवारी 114 तर शुक्रवारी तब्बल 434 जणांना सुट्टी देण्यात आली. 

ठळक मुद्देजिल्ह्यात गेल्या दोन दिवसात तब्बल 548 जणांनी कोरोनावर मात केली असून ते रुग्णालयातून घरी परतले आहेत.गेल्या 48 तासांत 354 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत.रुग्णालयातून गुरुवारी 114 तर शुक्रवारी तब्बल 434 जणांना सुट्टी देण्यात आली. 

यवतमाळ : संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यवतमाळमध्येही गेल्या 48 तासांत 354 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. मात्र, दिलासादायक गोष्ट म्हणजे, जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात तब्बल 548 जणांनी कोरोनावर मात केली असून ते रुग्णालयातून घरी परतले आहेत. तर एकूण 17 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यांपैकी पहिल्या 24 तासात 7 तर दुसऱ्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला.

बरे होऊन घरी परतलेले कोरोनाबाधित रुग्ण येथील वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड, तसेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये भरती होते. रुग्णालयातून गुरुवारी 114 तर शुक्रवारी तब्बल 434 जणांना सुट्टी देण्यात आली. 

पहिल्या 24 तासांत मृत्यू झालेल्या सात जणांमध्ये यवतमाळ शहरातील नवजात बालक, 52 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरूष, 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 65 वर्षीय पुरूष, आर्णी शहरातील 60 वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर दुसऱ्या 24 तासांत मृत्यू झालेल्या 10 जणांमध्ये यवतमाळ शहरातील 37 वर्षीय दोन पुरुष, 48 वर्षीय, 64 वर्षीय आणि तालुक्यातील 37 वर्षीय पुरुष, झरी जामणी शहरातील 60 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 64 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 52 वर्षीय पुरुष आणि जिल्ह्यातील एका पुरुषाचा समावेश आहे. तसेच गेल्या 48 तासांत आढळलेल्या 354 नव्या कोरोनाबाधितांत 215 पुरुष आणि 139 महिलांचा समावेश आहे. 

गेल्या 24 तासात आढळलेल्या 182 रुग्णांत 114 पुरुष आणि 68 महिलांचा समावेश आहे. यात आर्णी शहरातील दोन पुरुष, आर्णी तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरुष व दोन महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष व तीन महिला, दारव्हा शहरातील आठ पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील एक महिला, दिग्रस शहरातील पाच पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील नऊ पुरुष व तीन महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व एक महिला, मंगरूळपीर शहरातील एक पुरुष, मारेगाव शहरातील एक पुरुष व तीन महिला, मारेगाव तालुक्यातील एक पुरुष, नेर शहरातील 10 पुरुष व सहा महिला, नेर तालुक्यातील दोन महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व पाच महिला, पुसद शहरातील 15 पुरुष व दोन महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील सात पुरुष व आठ महिला, वणी शहरातील सात पुरुष व तीन महिला, वणी तालुक्यातील दोन पुरुष, यवतमाळ शहरातील 31 पुरुष व 22 महिलांचा समावेश आहे.

वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या 1234 ॲक्टीव्ह रुग्ण असून 389 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 6754 एवढी झाली आहे. यांपैकी 4939 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 182 मृत्युची नोंद आहे. सध्या आयसोलेशन वॉर्डात 303 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 65685 नमुने पाठविले असून यापैकी 64565 प्राप्त तर 1120 अप्राप्त आहेत. तसेच 57811 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र