अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशात दुसºया क्रमांकाचा म्हणून यवतमाळच्या दुर्गोत्सवाचा लौकिक आहे. खेड्यापाड्यांतून लाखो भाविक यवतमाळच्या दुर्गा मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करतात. पण चक्क ५५ देशांतील नागरिकही यवतमाळच्या दुर्गोत्सवात सहभागी होत आहेत. होय, ही बाब शक्य होतेय वेबसाईटच्या माध्यमातून. अन् ती बनवलीय यवतमाळच्याच सुपूत्राने. चंद्रेश हितेश सेता असे त्यांचे नाव.अमरावती परिमंडळात एकंदर ३ हजार सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळे आहेत. त्यातील २५९० मंडळे एकट्या यवतमाळ जिल्ह्यात आहेत. पण येथील दुर्गोत्सव महाराष्ट्रात क्रमांक एकचा असण्याचे खरे कारण आहे, येथील मूर्तिकारांनी साकारलेल्या ‘जिवंत’ मूर्ती. यवतमाळ शहरात बसविल्या जाणाºया १५४ मंडळांपैकी प्रत्येक मंडळाची मूर्ती अत्यंत देखणी, आश्वासक आणि आकर्षकही आहे.हा दुर्गोत्सव देशभरात आणि जगभरात पोहोचावा, या उद्देशाने चंदन सेता या तरुणाने १ आॅक्टोबर २०१६ रोजी ‘यवतमाळ नवरात्री’ नावाची वेबसाईट तयार केली. त्यावर नवरात्रोत्सवाचा इतिहास, येथील मंडळांची नावे, त्यांचे पदाधिकारी, दुर्गामूर्तीची छायाचित्रे, व्हिडिओ, नवरात्रीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अशी इत्थंभूत माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही भाविकाला यावर आपल्या मंडळाचा फोटो अपलोड करून तो जगभरात पोहोचविता येतो.या वेबसाईटचे हे दुसरेच वर्ष आहे. मात्र दोनच वर्षात चक्क जगभरातील ५५ देशांतील नागरिकांनी या वेबसाईटवरून यवतमाळचा दुर्गोत्सव पाहिला, अशी माहिती चंदन सेता यांनी दिली. या ५५ देशांपैकी भारतासह, अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्राझील, इटली, इंग्लंड, आस्ट्रिया, स्विझर्लंड या देशांमधून वेबसाईटला ‘ह्यूज ट्रॅफिक’ मिळत असल्याचे सेता म्हणाले.भारताबाहेरील ३ ते ४ हजार यूजर्स आताही नवरात्रीच्या काळात ‘यवतमाळ नवरात्री’ वेबसाईटला भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा यवतमाळच्या दुर्गादेवी पाहण्यासाठी शहरात गर्दी होत आहे. मात्र, मागील वर्षीच्या मूर्ती ज्यांना पाहावयाच्या आहेत, त्यांना या वेबसाईटवर सर्व छायाचित्रे, व्हिडिओ पाहता येतील. शिवाय, यंदाही मंडळांना रजिस्ट्रेशन करून जगभर पोहोचण्याची संधी आहे.पुण्या-मुंबईचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण यवतमाळचा दुर्गोत्सव महाराष्ट्रात पहिल्या आणि देशात दुसºया क्रमांकाचा असूनही त्याची हवी तेवढी प्रसिद्धी होत नाही. म्हणून वेबसाईटद्वारे हा उत्सव जतन करण्याचा प्रयत्न आहे.- चंद्रेश सेता, ‘यवतमाळ नवरात्री डॉट कॉम’चे निर्माते
५५ देशांतील लोक बघतात यवतमाळातील दुर्गोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 10:41 PM
देशात दुसºया क्रमांकाचा म्हणून यवतमाळच्या दुर्गोत्सवाचा लौकिक आहे. खेड्यापाड्यांतून लाखो भाविक यवतमाळच्या दुर्गा मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करतात.
ठळक मुद्देघरबसल्या वेबसाईटवर : गतवर्षीच्याही सर्व मूर्ती पाहण्याची सोय