ऑनलाईन लोकमतपांढरकवडा : पांढरकवडा नगरपरिषदेची अंदाजपत्रकीय सभा घेण्यात आली. यावेळी संभाव्य अर्थसंकल्प मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव व लेखापाल रवींद्र मंचलवार यांनी सादर केला. यामध्ये प्रारंभीक शिल्लक पाच कोटी ४४ लाख दर्शविण्यात आली. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकामध्ये ५७ कोटी ६७ लाख रूपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून सात कोटी ६६ लाख रूपये शिल्लकी अंदाजपत्रक आहे.या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष वैशाली नहाते होत्या. नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने नवीन दुकान गाळ्यांची निर्मिती तसेच शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या वीज खांबावर एलईडी पथदिवे बसवून विद्युत खर्च कमी करणे, वाढीव पाणी पुरवठा योजना म्हणून न.प.हद्दवाढ परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरिता नवीन पाण्याची टाकी, आदींची तरतूद करण्यात आली आहे. खुल्या जागा विकसीत करणे, बगीचा निर्माण करणे, दिव्यांगाकरिता शासनाच्या निर्देशाप्रमाणे योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात सहा लाखाची तरतूद करण्यात आली आहे.महिला व बालकल्याणच्या विकासाकरिता सहा लाखांचा निधी ठेवण्यात आला आहे. तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकरिता वाचन केंद्राची निर्मिती करणे, महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा निर्माण करण्यात आली असून प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत सदर अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात आली. अर्थसंकल्पास मान्यता प्रदान करण्यात आली. या सभेला नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, विभाग प्रमुख उपस्थित होते.
पांढरकवडा विकासासाठी ५७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 10:13 PM
पांढरकवडा नगरपरिषदेची अंदाजपत्रकीय सभा घेण्यात आली. यावेळी संभाव्य अर्थसंकल्प मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव व लेखापाल रवींद्र मंचलवार यांनी सादर केला.
ठळक मुद्देनगरपालिकेचा अर्थसंकल्प : सभेत मंजूरी, अखेरची शिल्लक सात कोटी ६६ लाख