लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी नरकचतुर्दशीला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. प्रत्यक्षात दुसरी नरकचतुर्दशी आली तरी कर्जमाफीमधील पात्र शेतकऱ्यांची यादी लागली नाही. विशेष म्हणजे, कर्जमाफीनंतर अकरावी ग्रिनलिस्ट लागल्यावरही जिल्ह्यातील ५७ हजार शेतकरी कर्जमाफीपासून दूर आहेत.जिल्ह्यातील दोन लाख ५२ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज दाखल केले. यातील एक लाख ९५ हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या खात्यात १०४२ कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामधील ५७ हजार शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून दूर आहेत. या शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे.कर्जमाफी जाहीर करण्यापूर्वी ग्रिन लिस्ट लावली जाते. यानंतर कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात वळती होते. यासाठी टप्प्या टप्प्याने ग्रिनलिस्ट जाहीर करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११ ग्रिनलीस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. अकरावी ग्रिन लिस्ट नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. या लिस्टमध्ये फेरनावाची तपासणी केली जात आहे. यानंतर ही यादी प्रसिद्ध होणार आहे. या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांचे खाते निल होणार आहे. अकराव्या यादीत ६० हजार शेतकऱ्यांची नावे येतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात या यादीत ३ हजार शेतकऱ्यांचीच नावे आली आहे. इतर नावांकरिता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र सातबारा खरोखरच कोरा होणार का याबाबत अजूनही साशंकता आहे.बँका कर्ज देतील काय?बँका कर्ज वितरणासाठी आखडता हात घेत आहे. अशातच सप्टेंबरमध्ये खरिपातील पीककर्ज वाटपाची मुदत संपली. यामुळे बँकांनी कर्जवाटपाची फाईल बंद केली आहे. सरकारने नव्याने कर्जमाफीची यादी जाहीर केली आहे. या यादीमधील शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका तयार नाही. याबाबत धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.
५७ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 9:42 PM
गतवर्षी नरकचतुर्दशीला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. प्रत्यक्षात दुसरी नरकचतुर्दशी आली तरी कर्जमाफीमधील पात्र शेतकºयांची यादी लागली नाही.
ठळक मुद्देनरक चतुर्दशीच्या मुहूर्ताचे काय ? : अकराव्या ग्रीन लिस्टमध्येही अनेकांचा समावेश नाही