- रूपेश उत्तरवारयवतमाळ : खरीप हंगामात महाबीजचे बियाणे कृषी विभाग अनुदानावर वितरित करीत आहे. त्याकरिता डीबीटी पोर्टलवर राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. सोडतीनंतर शेतकऱ्यांना क्विंटलमागे १२०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्याकरिता परमिटचा वापर होणार आहे. लॉटरी लागल्यानंतर शेतकऱ्यांना तत्काळ बियाणे उचलावे लागणार आहे.महाबीजची बॅग खासगी कंपनीतील बियाण्याच्या तुलनेत १२०० रुपयाने स्वस्त आहे. त्यावर अनुदान मिळणार आहे. यामुळे निर्धारित दरातही सूट मिळणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. राज्यातून सहा लाख ६७ हजार १६४ अर्ज दाखल झाले आहेत. एका शेतकऱ्याला दोन एकरासाठी दीड क्विंटल बियाणे मिळणार आहे. लॉटरी पद्धतीने करणार निवडआंतरपीक पद्धतीत तुरीचे बियाणे दिले जात आहे. हे बियाणे देण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याची लॉटरी अद्याप निघायची आहे. यासाठी राज्यात अडीच लाख शेतकरी आहेत.
बियाण्यांच्या लॉटरीसाठी ६ लाख शेतकरी प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 9:06 AM