रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या लढ्यात शहराला सुरक्षा देण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडले आहे. अशा स्थितीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणारे होमगार्ड अहोरात्र काम करीत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते नागरिकांना संरक्षण देत आहेत. विशेष म्हणजे त्यांची अस्थायी स्वरूपाची सेवा आहे. यानंतरही त्यांचे काम निष्ठापूर्वक पार पाडले जात आहे.शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. यामुळे पोलिसांच्या मदतीला होमगार्डची कुमक मागविण्यात आली आहे. विविध गावातून आलेले ही होमगार्ड कोरोनाच्या लढाईत एकनिष्ठेने आपले काम पार पाडताना दिसत आहे. दिवस-रात्र अशी १२ तासांची सेवा ते देत आहेत. शहरात वाहतूक नियंत्रित ठेवण्यासोबत कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याकरिता नागरिकांना कोरोनापासून सावध होण्याचे आवाहन होमगार्डनी केले आहे. अनेक लोक त्यांना सुरक्षा विषयावर हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते तितक्याच शांततेने त्यांना समजावतात. हाताबाहेर प्रकार असेल तर त्यांना त्यांच्या नियमानुसार कारवाईचा दंडही करतात. गृहरक्षक दलाचे जवान कोरोनापासून इतरांची सुरक्षा करीत आहे. यासोबतच स्वत:चीही काळजी घेत आहे. सॅनिटायझर, मास्क आणि हॅन्डग्लोजचा ते वापर करीत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देत आहे.ड्रेस, बूट मिळालेच नाहीहोमगार्ड मंडळींना लागणारा ड्रेस गत दोन ते तीन वर्षांपासून मिळालाच नाही. होमगार्ड म्हणून ज्यांची नियुक्ती झाली. त्यांनी स्वत:च गणवेश शिवून घेतला. बूटसह आवश्यक साहित्य घेतले आहे. त्यांना गणवेश मिळावे, अशी मागणी होमगार्डकडून होत आहे.पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून करतात कामपोलिसांच्या मदतीला यवतमाळ शहरातील विविध भागात ६०० होमगार्ड काम करीत आहेत. गाड्यांची तपासणी करणे, वाहनधारकांना पायबंद घालणे, गावात सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यासाठी ही मंडळी काम करीत आहे.नियमित डयूटी नाही, त्यातही अनेक महिने मानधन नाहीहोमगार्ड काम प्रामाणिकपणे पार पाडतात. मात्र त्यांनी केलेल्या ड्युटीचेच मानधन वेळेवर मिळत नाही. आधीच मोजक्या ड्यूट्या लागत असताना मानधन चार ते पाच महिने उशिरा केले जाते. यामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे इतर वेळेस होमगार्डला रोजमजुरीने जावे लागते.पोलीसभरतीची तयारीही सुरूपोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणारे होमगार्ड प्रत्येक कामात पोलिसांच्या बरोबरीने काम करीत आहे. विशेष म्हणजे पोलीस भरतीच्या स्पर्धा परिक्षेचा अभयास ही मंडळी करीत आहे. भविष्यात पोलीस म्हणून आपल्याला नोकरी मिळावी, ही त्यांची अपेक्षा आहे.‘होमगार्डला सहा महिने डयुटी’चा आदेश पायदळीहोमगार्डची नियुक्ती करतांना किमान सहा महिन्यांची ड्युटी मिळेल, अशी घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात साडेतीन महिने ड्युटी झाल्यानंतर पैशाअभावी अध्यादेश थांबविण्यात आला. तेव्हापासून होमगार्ड मंडळींना कामावरच बोलविण्याचे थांबविण्यात आले. आता कोरोनाच्या अडचणीत त्यांना पुन्हा बोलविण्यात आले. ते तितक्याच तत्परतेने प्रामाणिकपणे काम करताना दिसत आहेत.आरोग्यदायी सुरुवात व्यायामापासूनचहोमगार्ड असणाऱ्या कर्मचारी पोलीस भरतीची तयारी करीत आहे. ही तयारी करताना कोरोनाच्या भीतीने होमगार्ड आपल्या घरी पहाटेच योगासन आणि कवायती करतात. बाहेरगावी असलेले कर्मचारी प्रशासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी नित्यनेमाने व्यायाम करतात. या माध्यमातून उत्साह कायम राहतो. आणि रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असल्याची माहिती होमगार्ड कर्मचाऱ्यांनी दिली. हा नित्यक्रम सातत्याने नागरिकांनी करावा, असे ते म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्यात नागरिकांच्या संरक्षणार्थ उतरले ६०० होमगार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 5:22 PM