शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर 
2
नायब सिंह सैनी यांनी घेतली हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; कोण-कोण आमदार बनले मंत्री? पाहा संपूर्ण यादी...
3
नाशिकच्या भाजपा आमदाराची निवडणुकीतून माघार; कौटुंबिक कलह टाळण्यासाठी घेतला निर्णय
4
१७ वर्षांपासून साथ, पण विधानसभेच्या तोंडावर सहकाऱ्याने फिरवली पाठ; रवी राणांना मोठा धक्का!
5
सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले...
6
“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका
7
मुलगा सांगून मुलगी हातात दिली, बाळाच्या कुटुंबीयांचा संताप; अदलाबदलीबाबत संशयकल्लोळ
8
Nikhil Kamath यांनी खरेदी केलं घर; पूर्वी रेंटवर राहण्याला म्हणायचे फायद्याचं, 'या'मुळे बदलला निर्णय
9
प्रवाशांनो लक्ष द्या! ट्रेनमध्ये सामान चोरीला गेले तर रेल्वेची जबाबदारी; प्रवाशाची बॅग झाली होती चोरी, आता मिळणार ४.७ लाख रुपये
10
PAK vs ENG : पाकिस्तानचा 'गब्बर'! एकट्यानं इंग्लंडला लोळवलं; सात बळी अन् धवनसारखे सेलिब्रेशन
11
शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार, विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टाने १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश
12
अरे देवा! कार चालवताना हेल्मेट घातलं नाही म्हणून १००० रुपयांचा दंड; ट्रॅफिक पोलिसांचा कारनामा
13
एक राज्य, एक युती अन् एक आवाज!; महाराष्ट्राचं मैदान जिंकण्यासाठी NDA ची काय योजना?
14
Gold Silver Price 17 October: करवा चौथ पूर्वी सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर, चांदीच्या दरात घसरण; पाहा नवे दर
15
शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटलांचं नाव पुढे केल्याने मविआत खळबळ, संजय राऊत म्हणाले...
16
IND vs NZ: ४६ धावांत टीम इंडिया All Out! कशा गेल्या भारताच्या १० विकेट्स, पाहा Video
17
'केंद्राने 2 महिन्यांत जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा', सर्वोच्च न्यायालयात याचिका
18
राम कदम ते सुनील राणे...भाजपचे मुंबईत धक्कातंत्र?; ५ आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता
19
India's lowest score in Test cricket : परदेशात ३६ चा आकडा; मायदेशात किवींनी काढला फलंदाजीतील जीव
20
निवडणूक आयोगाने सांगूनही महायुतीकडून आचारसंहितेचा भंग; 'त्या' २०० निर्णयांची होणार चौकशी

४८०० विहिरींसाठी ६० हजार शेतकऱ्यांचे अर्ज ‘वेटिंग’वर

By admin | Published: February 19, 2017 12:37 AM

धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला ४८०० अतिरिक्त विहिरी मंजूर झाल्या. याकरिता जुन्या प्रक्रियेत

पुन्हा आॅनलाईन भरा अर्ज : जुन्या दोन हजार मंजूर विहिरी रद्द रूपेश उत्तरवार  यवतमाळ धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला ४८०० अतिरिक्त विहिरी मंजूर झाल्या. याकरिता जुन्या प्रक्रियेत ६० हजार अर्ज आले होते. आता न्यायालयाने ही प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. आचारसंहिता संपताच याची अंमलबजावणी होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी ६४ हजार विहिरींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक तालुक्याला ३०० अतिरिक्त वाढीव विहिरींचा लक्ष्यांक देण्यात आला. वाढीव अतिरिक्त विहिरी मिळविण्यासाठी ६० हजारांपेक्षा जास्त अर्ज आले. या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने वाढीव सिंचन विहिरींची प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्याचे आदेश दिले. ही प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने राबविण्याच्या सूचना रोजगार हमी योजनेचे उपसचिव डॉ. प्रमोद शिंदे यांनी दिले आहेत. आता निवडणुकांची आचारसंहिता संपताच नव्याने वाढीव सिंचन विहिरीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कामाला वेग येणार आहे. आठ वर्षापूर्वी वाढीव धडक सिंचन विहिरींचा निर्णय घेण्यात आला होता. याकरिता २००९ मध्ये प्रक्रिया राबविण्यात आली. ३१ जानेवारी २०१७ पर्यंत वाढीव विहिरीचा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना होत्या. मात्र निवडणुका आल्यामुळे वाढीव सिंचन विहिरींच्या कार्यक्रमाला ब्रेक लागला. आचारसंहिता संपताच प्रक्रिया नव्याने राबवावी लागणार आहे.