शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

‘महादीप’च्या अंतिम फेरीत ६१४ विद्यार्थ्यांची भरारी

By अविनाश साबापुरे | Published: March 09, 2024 5:19 PM

इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत. सुरुवातीला शाळास्तरावर, नंतर केंद्रस्तरावर परीक्षेच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या.

यवतमाळ : खेड्यापाड्यातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लावून चक्क विमानवारी घडविणाऱ्या महादीप परीक्षेची अंतिम फेरी शनिवारी उत्साहात पार पडली. या जिल्हास्तरीय अंतिम फेरीत तब्बल ६१४ विद्यार्थ्यांनी मजल मारली. आता यातून गुणवंत ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानवारीसह विविध बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे.

जिल्हा परिषदेतर्फे गेल्या वर्षभरापासून शाळांमध्ये या परीक्षेसाठी लिखित साहित्यासह तयारी करवून घेतली जात होती. इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी आहेत. सुरुवातीला शाळास्तरावर, नंतर केंद्रस्तरावर परीक्षेच्या दोन फेऱ्या घेण्यात आल्या. त्यातून गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर दोन फेऱ्यांमध्ये परीक्षा घेण्यात आली. या फेऱ्यांमधून गुणवत्ताप्राप्त ठरलेल्या ६१४ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. यामध्ये मराठी माध्यमाचे ५२६ आणि उर्दू माध्यमाच्या ८८ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ही जिल्हास्तर परीक्षा शनिवारी दुपारी १२ ते १:३० या वेळेत जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात घेण्यात आली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्‍की यांच्या नियंत्रणात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, जिल्हा समन्वयक तथा विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, उपशिक्षणाधिकारी डाॅ. निता गावंडे, राजू मडावी यांच्या मार्गदर्शनात ही महादीप परीक्षा पार पडली. गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, प्राचार्य डॉ. विजय भांबेरे, सचिव डॉ. शितल वातीले, राजकुमार भोयर, अमोल भेदोडकर, अधीक्षक सूरज राठोड, सुनिल कांबळे, शेख जिशान नाजीश, राजहंस मेंढे, शाम माळवे, नदिम पटेल, नागोराव कोमपलवार, महेश सोनेकर, शरद घारोड आदींची उपस्थिती होती. 

परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून अंजली नेमा, पल्लवी वानखडे, मिनल राऊत, तृशाली केशवार, नरेंद्र पाटणे, वर्षा मिश्रा, सुचिता राऊत, योगेश चटके, वैशाली वाघचोरे, अश्विनी मुडे, राहुल गुल्हाणे, अमोल पाटील, अविनाश उमप, प्रविणा इंगोले, उज्वला भाविक, अंजली पुराणीक, उज्वला भाविक, पल्लवी नौकरकर यांनी काम पाहिले. कार्यालयीन साधनव्यक्ती सुलोचना राऊत, माधुरी चंद्रे, निलिमा पाटील, समता मेश्राम, ज्योती लांडे, रेखा भगत, आसिया शेख, शगुफ्ता खान, रिजवान अहमद यांनी काम पाहिले.

राज्यात एकमेव ठरला उपक्रम

महादीप परीक्षा हा यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा आगळा वेगळा उपक्रम ठरला आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून अविरत राबविला जात आहे. त्यानंतर किशोर पागोरे आणि आता प्रकाश मिश्रा या शिक्षणाधिकाऱ्यांनीही महादीप उपक्रमासाठी उत्साहाने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची सवय लावून त्यांना पुढील आयुष्यात एमपीएससी, यूपीएससीसाठी तयार करणे हा या परीक्षेचा उद्देश आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ