लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने यावर्षी पिकांच्या उतारीत घट येण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तथापि नजर पैसेवारी जवळपास ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांना झटका बसला आहे.यावर्षी सुरूवातीपासूनच शेतकरी नैसर्गिक संकटात सापडले. नंतर विविध किडींच्या आक्रमणाने बेजार झाले. कापसाला पर्यायी पीक म्हणून पसंती मिळालेले सोयाबीन अपुºया पावसाने पूर्णत: करपले. अनेक शेतकऱ्यांनी तर सोयाबीन सवंगलेसुद्धा नाही. त्यातच कपाशीवर बोंडअळीने हल्ला केला. या दुष्टचक्रात शेतकरी भरडले जात असताना महसूल विभागाने जिल्ह्याची नजर पैसेवारी मात्र ६५ पैसे असल्याचे संकेत दिल्याने शेतकरी चक्रावून गेले आहे. कपाशी, सोयाबीनवर विविध कीड, अळींनी हल्ला केल्यानंतरही पैसेवारी जादा निघत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. जादा पैसेवारीमुळे दुष्काळ घोषित होण्याचा मार्ग बंद होणार आहे.विशेष म्हणजे नजर पैसेवारीसाठी पीक कापणी प्रयोग सुरू असताना जिल्हाधिकाºयांनी स्वत: शेतात जाऊन शेतमालाची पाहणी केली. शेतातील उभी पिके त्यांच्या नजरेखालून गेली. पिकांची अवस्था बघून ते व्यथीतही झाले होते. त्यामुळे महसूलच्या अहवालातून वास्तव पुढे येईल, असा विश्वास शेतकºयांना होता. प्रत्यक्षात नजर पैसेवारी ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. यावर्षी ऐनवेळी पावसाने दडी मारल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. यात शेतकºयांना मात्र मोठा फटका बसला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मदतीची मागणी करीत आहे. पिकांची स्थिती अद्याप चिंताजनक आहे. तरीही उत्तम पैसेवारी निघत असल्याने शेतकºयांच्या मदतीच्या आशा मावळल्या आहे. आता सुधारित आणि अंतिम पैसेवारीवरच सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. सुधारित आणि अंतिम पैसेवारी ५0 टक्केच्या आत आल्यासच शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळू शकणार आहे. यामुळे सुधारित आणि अंतिम पैसेवारीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष राहणार आहे.असा ठरविला जातो दुष्काळदुष्काळ ठरविण्यासाठी केंद्र सरकाने काही निकष निश्चित केले आहे. या निकषात बसल्यासच दुष्काळ जाहीर केला जातो. पाऊस, पीक, आर्द्रता आणि पावसामधील खंड, यावरून दुष्काळ जाहीर केला जातो. जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण उत्तम आहे. मात्र मध्यंतरीच्या खंडाने सोयाबीनचे उत्पादन घटले. तथापि हा खंड २२ दिवसांपेक्षा जादा असावा लागतो.
जिल्ह्यातील पिकांची नजर पैसेवारी ६५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 9:57 PM
निसर्गाच्या लहरीपणाने खरीप पिकांना मोठा फटका बसल्याने यावर्षी पिकांच्या उतारीत घट येण्याची भीती शेतकºयांना सतावत आहे. तथापि नजर पैसेवारी जवळपास ६५ टक्के निघण्याचे संकेत प्राप्त झाल्याने शेतकºयांना झटका बसला आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना झटका : अंतिम पैसेवारीवर ठरणार दुष्काळ