लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ४५ अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 65 जण भरती आहेत. यात 20 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.गत २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाला ३७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ३३ रिपोर्ट निगेटिव्ह तर ४ रिपोर्टचे अचूक निदान नसल्यामुळे त्यांचे नमुने तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार आहे. संस्थात्मक विलगीकरणात ११ जण तर गृह विलगीकरणात एकूण १११३ जण आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला असून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५३ जण बरे झाले आहेत.नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे. नियमित मास्कचा वापर करावा. विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर जावे लागल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.