शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पुसद उपविभागात ७० टक्के पेरणी उलटली

By admin | Published: July 25, 2014 12:05 AM

पुसद कृषी उपविभागातील ७० टक्के पेरणी उलटली असून ६० हजार हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन दिवस तुषार सिंचनासारखा पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.

अशोक काकडे - पुसद पुसद कृषी उपविभागातील ७० टक्के पेरणी उलटली असून ६० हजार हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन दिवस तुषार सिंचनासारखा पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांवर घोंगावत आहे. उशीरा होणाऱ्या पेरणीचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होण्याची भीती आहे. पुसद कृषी उपविभागात पुसद, उमरखेड, महागांव, दिग्रस या तालुक्यांचा समावेश आहे. उपविभागाचे भौगोलिक क्षेत्र ३ लाख ६० हजार हेक्टर असून वाहितीखाली २ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १ लाख ७१ हजार हेक्टरवर पेरण्या अटोपल्या आहेत. यंदा आकाशात ढग जमले परंतू बरसलेच नसल्याने जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांचे पहिल्या पेरणीचे नुकसान झाले आहे. तीन दिवसाच्या पावसाने बियाण्याला अंकुर फुटले असले तरी वाहुन जाण्यासारखा एखादा पाऊस येण्याची वाट शेतकरी पाहत आहे. उपविभागात पिकाला पोषक पाऊस पडला असला तरी जमिनीची तहान अद्यापही भागलेली नाही. साधारणत: उपविभागातील अटोपलेल्या पेरणीमध्ये पुसद तालुक्यात ७४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २३ हजार ६७४ हेक्टर सोयाबीन आणि कापूस २१ हजार ७०३ हेक्टर क्षेत्रामध्ये पेरण्यात आला. दिग्रस तालुक्यात ३७ हजार ५४ हेक्टर पैकी सोयाबीन १३ हजार ५३० हेक्टरवर आणि कापूस १६ हजार ९९७ हेक्टर लागवड झाली. उमरखेड तालुक्यात ६६ हजार ७५६ क्षेत्रापैकी सोयाबीन ५ हजार ७४४ आणि कापूस १२ हजार ४९० हेक्टरवर तर महागांव तालुक्यातील ६० हजार ४०४ हेक्टर क्षेत्रापैकी सोयाबीन १९ हजार १५० आणि कापूस ३१ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. उपविभागातील २ लाख ३८ हजार ९१७ हेक्टरपैकी कापूस, सोयाबीन व इतर पिकांची १ लाख ७१ हजार २४६ हेक्टरवर पेरण्या केल्या. आता ७० टक्के पेरणी उलटली असून शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करवावी लागत आहे. बियाण्याच्या पैशासाठी दुसऱ्याकडे हात पसरावे लागते.