शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

७० हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचा चेंडू ‘आयटी’कडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 9:44 PM

जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे.

ठळक मुद्देमुंबईकडे लक्ष : दोन दिवसात लागणार ग्रीन लिस्ट, ५४ कोटींचे कर्ज अद्यापही कायमच

रूपेश उत्तरवार ।ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. त्यांच्या मिसमॅच खात्याचा चेंडू आता मुंबई येथील आयटी विभागाकडे आहे. येत्या दोन दिवसांत हा विभाग ग्रीन लिस्ट प्रकाशित करणार आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित शेकऱ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहे.मुख्यमंत्र्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत कर्जमाफीचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली. त्याचा ११ फेबु्रवारीला आढावा घेण्यात आला. राज्यातील बँकांची स्थिती सहकार आयुक्तांनी जाणून घेतली. आता ‘मिसमॅच’ खाते आणि काही खासगी बँकांचे अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र आयटी विभागाचा ग्रीन सिग्नल शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. यामुळे येत्या दोन दिवसात सर्व कर्ज खाते निल होईल का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कर्जमाफीचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे म्हणून सहकार विभागाची यंत्रणा झटत आहे. त्यांनी मिसमॅच दस्तावेजाची फेरतपासणी करून मुंबईच्या आयटी विभागाकडे अहवाल पाठविला. आता मुंबईचा आयटी विभाग ग्रीन लीस्ट प्रकाशित करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे वळते होणार आहे. जिल्ह्यातील ७० हजार शेतकऱ्यांचे कर्जखाते अद्याप क्लिअर झाले नाही. यापैकी तब्बल ६४ हजार खाते मिसमॅच आहे. इतर खात्यातील कर्ज प्रक्रिया राष्ट्रीयीकृत बँकाकडून पूर्ण केली जात आहे. सहकार विभागाने जिल्ह्यातील ६४ हजार शेतकऱ्यांच्या खात्याचा अहवाल दुरूस्त करून पाठविला. यामुळे ग्रीन लीस्ट लागताच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होतील. मात्र केवळ दोन दिवसांत हे काम पूर्ण होणे सध्या तरी तारेवरची कसरत ठरणारे आहे.८९२ कोटींची कर्जमाफीजिल्ह्यातील दोन लाख ४७ हजार ९५६ हजार शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी अर्ज दाखल केले. या खात्यांवर ९४७ कोटी ६१ लाखांचे कर्ज आहे. यातील एक लाख ७७ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात ८९२ कोटी रूपयांची रक्कम वळती झाली आहे. ७० हजार शेतकऱ्यांच्या ५४ कोटींच्या कर्जावरील मंजुरीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे.