शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

४० वाहनांना आठ लाख दंड

By admin | Published: July 13, 2017 12:17 AM

तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन महसूल विभागाने तब्बल ४० वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर

अवैध गौण खनिज उत्खनन : उमरखेडच्या महसूल यंत्रणेची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : तालुक्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन महसूल विभागाने तब्बल ४० वाहनांवर कारवाई केली असून, त्यांच्यावर आठ लाख दोन हजार १०० रुपये दंड आकारला आहे. विशेष म्हणजे ‘लोकमत’ने ११ जुलैच्या अंकात ‘पैनगंगा पात्रात रात्रीच्या अंधारात रेती तस्करी’ असे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला. उमरखेड तालुक्यात रेती, मुरूम, डब्बर, लाल माती आदी गौण खनिजाचे अवैध उत्खनन करण्याचा धडका तस्करांनी लावला आहे. यामुळे शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. या तस्करांविरुद्ध महसूल विभागाने धडक मोहीम सुरू केली. तहसीलदार भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनात वालतूर, उमरखेड, ब्राह्मणगाव, पिंपळगाव, निंगणूर, कारखेड, गौरलेगाव, विडूळ, चुरमुरा, बोरी चातारी, ढाणकी, देवसरी, लोहरा, बाळदी, इसापूर, झाडगाव, टेंभूरदरा, मेट, हरदडा, पोफाळी, बोरगाव, सावळेश्वर आदी ठिकाणी ४० वाहने पकडण्यात आली. त्या वाहनांवर आठ लाख दोन हजार १०० रूपये दंड ठोठावला. महसूल विभागाने सुरू केलेल्या धडक मोहिमेने तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदी पात्रातून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. स्थानिकांना हाताशी धरून ही तस्करी सुरू आहे. यासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्यांचीच दखल घेत महसूल विभागाने कारवाईचा धडका लावला.