लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोणत्याही रुग्णालयात तेथील आरोग्य सेवेचा कणा हा तेथील नर्सेस असतात. उपचारसोबत रुग्णाला योग्य सुश्रृश्रा तितकीच गरजेची असते. मात्र स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेच्या कण्यालाच रिक्तपदाचे ग्रहण लागले आहे. तब्बल ८० जागा रिक्त असलेल्या साठ बेडची जबाबदारी केवळ एका नर्सवर येऊन ठेपली आहे.शासकीय रुग्णालयात दिवसाला बाह्यरूग्ण विभागात एक हजार ८०० ते दोन हजार रुग्ण तपासणीसाठी येतात. यातील ७०० रुग्ण दाखल होता. रुग्णालयात एकूण ७६० बेड असून त्यावर कायम रुग्ण उपचारासाठी दाखल असतो. या कामाची व्याप्ती पाहता नर्सेसची मंजूर पदेच कमी पडतात. रुग्णांच्या संख्येप्रमाणे रुग्णालयाला वाढीव पद मंजुरीची आवश्यकता आहे. यासाठी रुग्णालय प्रशासनाचा मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात मंजूर पदापैकीच ८० जागा रिक्त आहेत. यामध्ये अधिपरिचारिका ३८, विभागीय परिसेविका पाच, परिसेविका २७, बालरोग परिसेविका एक आणि मनोरूग्ण परिसेविका दोन अशी पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत नर्सेसवरचा कामाचा ताण वाढला आहे. शिवाय रुग्णांनाही योग्य सेवा मिळत नाही. सातत्याने तक्रारी वाढत आहे. अशातच रुग्णालयात अद्ययावत बालरोग विभाग तयार होत आहे. यामध्ये आधुनिक असे एनआयसीयू कक्ष, मेडिसीनमध्ये हिमोडायलासीस युनिट सुरू केले जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी नर्सेसची आणखी गरज पडणार आहे. साधन सामग्रीसोबतच पद निर्मितीही आवश्यक झाली आहे. नर्सेसच्या जुन्या पॅटर्न मध्ये बदल करून नवीन संरचनेनुसार वाढीव पद मिळावी पाठपुरावा सुरू आहे. यवतमाळ सारख्या आडवळणावर असलेल्या गावात बाहेरून येणाऱ्या नर्सेसची संख्या कमी आहे.
‘मेडिकल’मध्ये परिचारिकांची ८० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:03 PM
कोणत्याही रुग्णालयात तेथील आरोग्य सेवेचा कणा हा तेथील नर्सेस असतात. उपचारसोबत रुग्णाला योग्य सुश्रृश्रा तितकीच गरजेची असते. मात्र स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेच्या कण्यालाच रिक्तपदाचे ग्रहण लागले आहे.
ठळक मुद्देरुग्णसेवा प्रभावित : दिवसाकाठी ७६५ रुग्ण होतात दाखल, वाढीव पदमंजुरीचा प्रस्ताव शासन स्तरावर