लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येते.जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत ६३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १२६ उपकेंद्र आहेत. शिवाय उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे. त्यानंतरही जीवघेणा कॉलराची साथ झपाट्याने पसरत आहे. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुस्त असून याची खबरताबही त्यांना नाही. इतकेच नव्हेतर जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधीसुध्दा याकडे गांभीर्याने बघण्यास तयार नाही.शासकीय वैद्यकीय महाविद्यालया एप्रिल महिन्यापासून ५ जूनपर्यंत ४०१ रुग्ण दाखल झाले आहेत. यातील ८३ रुग्णांना कॉलरा असल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट झाले आहे. कॉलरा हा जलजन्य आजार असून त्याचा झपाट्याने फैलाव होते. वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या नाही तर परिस्थीती हाताबाहेर जाऊ शकते. ग्रामीण व शहरी भागात डायरीचेही अनेक रुग्ण आहेत. गुरूवारी वैद्यकीय महाविद्यालयातील संसर्ग प्रतिबंध वॉर्डात २२ रूग्ण उपचार घेत आहे. या सर्वांना डायरीयाची लागण झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात दर दिवशी या रुग्णांची संख्या वाढत आहे. याबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने ग्रामीण आरोग्य यंत्रणेला अवगत केल्यानंतरही प्रतिबंधात्मक उपया योजना होताना दिसत नाही.जिल्ह्यातील परसोडी, देऊरवाडी, म्हसोला (आर्णी), आसेगावदेवी (बाभुळगाव), भुलाई (दारव्हा), मांगलादेवी (नेर), नागीपोड (राळेगाव), वाटखेड, जामडोह, तिवसा, किन्ही (यवतमाळ), दोनोडा (कळंब) या गावांमधून रूग्ण दाखल झाले आहेत. या शिवाय शहरातील पाटीपुरा, नेताजीनगर, माळीपुरा, वडगाव, सुभाषनगर, वंजारीफैल, पिंपळगाव, सिंघानीयानगर, उमरसरा येथील रुग्ण दाखल झाले आहेत. नगरपरिषद प्रशासनाकडून येथील स्वच्छता व शुध्द पाणीपुरवठ्यासाठी कोणतीच उपाय योजना केली जात नाही. इतकेच नव्हे तर नगरपरिषद आरोग्य विभाग डुकरांचे नियंत्रण करण्यात अपयशी ठराला आहे.नगरपरिषदेचा प्रतिसाद नाहीपालिकेच्या आयुर्वेदिक दवाखान्यात नियमित डॉक्टर ठेवण्याचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून देण्यात आला. येथे सर्वच विभागातील डॉक्टर सेवा देतील असे प्रस्तावित केले होते. मात्र नगरपरिषदेने याला मान्यता दिली नाही. येथे मोठी जागा असूनही स्थानिक रुग्णासाठी पालिकेतूनच आडकाठी निर्माण केली जात आहे. नागरी आरोग्य केंद्रात रुग्णांचा प्रतिसाद नसल्याने आयुर्वेदिक रुग्णालयातून सेवा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
जिल्ह्यात कॉलराचे ८३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 9:31 PM
जिल्ह्यात २० वर्षानंतर पुन्हा कॉलराने डोके वर काढले असून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या ८३ रुग्णांना कॅलरा झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉलराचे रुग्ण आढळून आल्यानंतरही ग्रामीण आरोग्य यंत्रणा निद्रिस्त असल्याचे दिसून येते.
ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा सुस्त : २० वर्षानंतर जीवघेणा कॉलरा परतला