सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातच नव्हे सर्वत्र कोरोना आजाराचा संसर्ग व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची चर्चा होत आहे. या स्थितीत इतर आजाराने, अपघात, विषबाधा, सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या तुलनेत याचे प्रमाण किती तरी पटीने अधिक आहे. मार्च महिन्यापासून २६ आॅगस्टपर्यंत इतर आजाराने ६५३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहे. उपचारासाठी १८ हजार १९९ रूग्ण दाखल झाले. बाह्यरूग्ण तपासणी विभागातून एक लाख २७ हजार ४१३ रूग्णांनी तपासणी केली.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. तेथील रुग्णांची आकडेवारी व त्यांचा मृत्यू याचा लेखाजोखा तपासल्यास कोरोनाचा मृत्यूदर तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेण्याऐवजी योग्य खबरदारी घेऊन संसर्गाची लक्षणे वाटल्यास वेळेत उपचार घेण्याची गरज आहे. याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून विविध माध्यमातून केले जाते. प्रत्यक्षात इतर आजार जिल्ह्यात धोकादायक ठरत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.दूषित पाणी, दारूने दुर्धर आजार जडतात. याचा परिणाम किडणी, लिव्हर या अवयवांवर होतो. ग्रामीण भागात विषारी दारूचे सेवन केले जाते. हातभट्टीची ही दारू अतिशय घातक ठरत आहे. त्यावर नियंत्रण नसल्याने सर्वाधिक रुग्ण याचे उपचारासाठी येतात. अशा व्यसनी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यावर कोणती उपाययोजना नाही. सर्वत्र खुलेआम हातभट्टी व अवैध दारू विक्री सुरू आहे. अपघातात मरणाºयाचेही प्रमाण अधिक आहेत. आता फवारणीचा कालावधी असल्याने विषबाधा झालेले रुग्ण येत आहेत. शेतात काम करताना सर्पदंश झालेले रुग्ण येत आहे.या विविध कारणाने होणाºया मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणता येते. मात्र शासन दरबारी याचा स्वतंत्र विचार केला जात नाही. ही आकडेवारी वैद्यकीय रुग्णालयातून शासनाचे धोरण निश्चित करणाºया घटकापर्यंत पोहोचत नाही. फवारणी विषबाधेचा मुद्दा राजकीय वळणावर गेल्यावरच त्याची दखल घेतली जाते.प्रशासनस्तरावरून कोरोना संसर्ग व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची काटेकोर नोंद ठेवली जात आहे. इतकेच नव्हे तर संसर्गाचा फैलाव होऊन नये म्हणून कोरोना मृतावर नगरपरिषदेची चमू अंत्यसंस्कार करत आहे. यामुळे सर्वसमान्यांनी याची धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे तीन हजार २४९ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी २२१९ बरे झाले आहेत. तर ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरीही कोरोनामुळे होणाºया मृत्यूची सर्वात जास्त भीती बाळगली जात आहे. तुलनेने इतर अजारामुळे होणाºया मृत्यूकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना इतकीच खबरदारी इतर आजाराच्या मृत्यूबाबत घेतल्यास मृत्यूदर कमी करता येणार आहे.3,286जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरसह मेडिकलमध्ये केलेल्या एकूण तपासणीपैकी आतापर्यंत तीन हजार २८६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यापैकी दोन हजार ४६२ (६८.२९%) रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे झाले. तर आता कोरोना वार्डसह अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९७ (२३.९७%) इतकी आहे. तर यापैकी ८५ (२.६४%) पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही आकडेवारी ३० आॅगस्टपर्यंतची आहे.1,27,413मेडिकलच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागात गेल्या सहा महिन्यात एक लाख २७ हजार ४१३ रुग्ण तपाणीसाठी आले. यापैकी एक लाख ९ हजार २१४ रुग्ण (८५.७१%) बाह्य विभागातच उपचार घेऊन घरी परत गेले. तर १८ हजार १९९ रुग्ण (१४.२८%) रुग्णालयातील विविध विभागात उपचारासाठी दाखल झाले. यापैकी ६५३ (३.५८%) रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूला विविध कारणे आहेत.
कोरोनाने ८५ तर इतर आजाराने ६५३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 5:00 AM
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. तेथील रुग्णांची आकडेवारी व त्यांचा मृत्यू याचा लेखाजोखा तपासल्यास कोरोनाचा मृत्यूदर तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेण्याऐवजी योग्य खबरदारी घेऊन संसर्गाची लक्षणे वाटल्यास वेळेत उपचार घेण्याची गरज आहे. याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून विविध माध्यमातून केले जाते.
ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय : मार्र्च ते आॅगस्टची स्थिती, कोरोनाचा मृत्यूदर कमीच, अवैध दारूचे सर्वाधिक रुग्ण