-अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे सहकार्य
फोटो
दारव्हा : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ८७ जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनी केले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे होते. पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, नगराध्यक्ष बबनराव इरवे, तहसीलदार सुभाष जाधव, मुख्याधिकारी धीरज गोहाड, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता विक्रांत शिरभाते, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय मांगे, वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय करमलकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय राहणे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज सिंगी, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मदन पोटफोडे, प्राचार्य डॉ. विलास राऊत, वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद राऊत, अभियंता अंबादास गुघाने प्रामुख्याने उपस्थित होते. श्रीधर मोहोड यांनी श्रद्धेय बाबूजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा दिला. बाबूजींनी नेहमी विकासात्मक आणि सामाजिक कार्याला महत्त्व दिले. लोकमत रक्तदान शिबिराच्या निमित्ताने तोच वारसा जपत असल्याचे ते म्हणाले. एसडीओ देशपांडे यांनी सध्या रक्ताची अत्यंत आवश्यकता असून लोकमतने हा उपक्रम राबवून महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे सांगितले. धन्वंतरी व जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नंतर तालुक्यात रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवून जनजागृती करणाऱ्या पाटील ग्रुपचे भैरव भेंडे, एकशे एकदा रक्तदान करणारे किशोर घेरवरा यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अशोक काटकर, नगरसेवक प्रकाश गोकुळे, शरद गुल्हाने, माजी उपनगराध्यक्ष सुशील राठोड, डॉ. मनोज राठोड, प्राचार्य सुरेश निमकर, धनगर समाज सेवा संस्थेचे विदर्भ अध्यक्ष दिलीप बांबल, संजय बिहाडे, डॉ. देशपांडे, ॲड. नितीन जवके, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुशांत इंगोले, भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण पवार, बहुजन मुक्ती पार्टीचे बिमोद मुधाने, प्रहारचे स्वप्नील मापारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक लोकमतचे तालुका प्रतिनिधी मुकेश इंगोले, तर आभार डॉ. नीतीन भेंडे यांनी मानले.
यशस्वतीसाठी संतोष तांगडे, नितीन कोल्हे, खिलेश घेरवरा, संजय दुधे, देवानंद इरेगावकर, संजय गडपायले, विशाल झाडे, रवी तगडपल्लेवार, मंगेश इंगोले, पवन काशीकर, गोंविंदा घावडे, प्रवीण बन्सोड, भोला पवार, केशव गायकवाड, राजकुमार महल्ले, तुषार उघडे, राजू राठोड, पंकज शेंदूरकर, रक्तपेढी टीमचे आशिष दहापुते, डॉ. राजीव धोत्रे, केशीराज मांडवकर, बाबाराव राठोड, नीलेश खंडाळकर, महेश मिश्रा, दानीश शेख तसेच उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बॉक्स
यांचे लाभले सहकार्य
शिबिरासाठी पंचायत समिती, नगर परिषद, मुंगसाजी महाराज महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, धनगर समाज सेवा संस्था, जिम आखाडा मित्रमंडळ, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, बहुजन मुक्ती पार्टी, युवा सेना, माँर्निंग वाँक ग्रुप, पाटील ग्रुप, संगणक परिचालक संघटना, कृषी साहित्य विक्रेता संघटना, शिक्षक समिती आदींनी सहकार्य केले.
बॉक्स
पती, पत्नी, मुलीने केले रक्तदान
नगर परिषदेचे हिरासिंग राठोड, वंचित आघाडीचे प्रमोद राऊत, श्रीकांत सहारे यांनी रक्तदान करून आपला वाढदिवस साजरा केला. स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाचे अध्यक्ष दिनेश नरवडे, त्यांची पत्नी प्राचार्य ममता नरवडे व मुलगी समीक्षा यांनी सहपरिवार रक्तदान केले. प्रीती खारोडे, आशा कोवे, नोगिता माडीशेट्टी, प्रतीभा जाधव आदी महिलांनी रक्तदान केले. शिबिराला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी भेट दिली. त्यांनी या कार्याची करावी तेवढी प्रशंसा कमी असल्याचे सांगितले.
080721\20210708_104110.jpg
दारव्हा येथे ८७ दात्यांनी केले रक्तदान