11 Jan, 19 07:22 PM
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या भाषणातील काही मुद्दे
आयोजकांना काळाची गरज कळली नाही.
साहित्यबाह्य विषयांवरून विरोध चुकीचा.
आपला विवेक जागृत करण्याची वेळ.
महात्मा गांधी यांनी मूठभर मीठ उचलले, आणि एका महासत्तेविरोधात आंदोलन केले.
11 Jan, 19 06:42 PM
नवी पिढी सायबर गुलाम झाली आहे - तावडे
साहित्य महामंडळाला वर्षभरात 70 लाखांची मदत दिली.
आठवी पर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य.
नवी पिढी सायबर गुलाम झाली आहे.
साहित्यिकांना विद्यार्थ्यांना सायबर विळख्यातून बाहेर काढायला उपाययोजना आखण्याचे आवाहन
11 Jan, 19 06:37 PM
विनोद तावडे यांच्या भाषणावेळी संभाजी ब्रिगेडने दाखविले काळे झेंडे
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या भाषणावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्य़कर्त्या ंनी घोषणाबाजी केली.
11 Jan, 19 06:30 PM
विनोद तावडे यांच्या भाषणावेळी उपस्थितांचा गोंधळ
विनोद तावडे यांच्या भाषणावेळी उपस्थितांचा गोंधळ
तर आपल्या भाषणाशी या गोंधळाचा संबंध नसल्याचे तावडेंकडून स्पष्टीकरण
11 Jan, 19 06:02 PM
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत; नयनतारा सहगल यांच्या विचारांना सलाम : लक्ष्मीकांत देशमुख
नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण रद्द करणे चुकीचेच होते.
या घटनाक्रमामध्ये अजानतेपणी मी ही सहभागी, या घटनेचा निषेध करतो.
11 Jan, 19 05:57 PM
पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली; शाली येडे यांची टीका
पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन असे वाटून पतीने आत्महत्या केली.
मी हीच वायद्याची शेती , माझ्या हिमतीवर फायद्याची करून दाखवणार हा विश्वास आहे.
या व्यवस्थेने माझ्या पतीचा बळी घेतला.
जगरहाटीने विधवापण लादल्याची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांची टीका.
11 Jan, 19 05:40 PM
नयनतारा सेहगल यांचा मास्क लावणाऱ्या महिलांना पोलिसांनी बाहेर काढले
11 Jan, 19 05:32 PM
साहित्य संमेलनात झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ पाहा...
11 Jan, 19 05:20 PM
नयतारा सेहगल यांचा मास्क लावलेल्या महिलांवर आक्षेप घेतल्याने यवतमाळ संमेलन उदघाटन कार्यक्रमात गोंधळ
11 Jan, 19 05:17 PM
काही साहित्यीकांनी नयनतारा सेहगल यांचा मास्क लावून निषेध केला
11 Jan, 19 05:12 PM
संमेलनात ड्रोनचा वापर
11 Jan, 19 05:10 PM
वैशाली येडे, अरुणा ढेरे यांच्या हस्ते रिमोटद्वारे दीपप्रज्वलन
यवतमाळ येथे आयोजित 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना मान्यवर
11 Jan, 19 02:07 PM
11 Jan, 19 03:07 PM
नयनतारा सहगल यांच्या भाषणाच्या 2000 प्रतींचे होणार वाटप!
प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार नसल्या तरी त्यांच्या विचारांचा जागर होणार आहे. नयनतारा यांच्या भाषणातील मुद्दे परखड असल्याने त्यांचे आमंत्रण रद्द करण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा विरोध करण्यासाठी सहगल यांच्या भाषणाच्या 2000 प्रतींचे उद्घाटन स्थळी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विचारांच्या रूपाने त्यांचा संमेलनात वावर असणार असल्याचे बोलले जात आहे.
11 Jan, 19 10:23 AM
संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या हस्ते दिंडीस आरंभ. रांगोळी काढून, फटाक्यांची आतषबाजी करुन दिंडीचे चौकाचौकात स्वागत
11 Jan, 19 10:11 AM
यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी आणि संमेलनच्या उद्घाटनकर्त्या वैशाली येडे यांनी फुगडीचा फेर धरला
11 Jan, 19 10:10 AM
साहित्य संमेलनाची ग्रंथ दिंडीनं सुरुवात
11 Jan, 19 09:30 AM
ग्रंथ दिंडी
11 Jan, 19 09:30 AM