कळंब (यवतमाळ) : घरासाठी पायवा खोदताना भिंत कोसळून वृद्ध मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी परसोडी (बु) येथे घडली. कैलास काशीनाथ ढोले असे या मजुराचे नाव आहे.
परसोडी (बु) येथील जगताप यांच्या घरासाठी कैलास ढोले पायवा खोदत होते. सोबत तीन मजूरही होते. हे काम करत असताना बाजूची भिंत ढोले यांच्या अंगावर कोसळली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा तपास कळंब पोलिस करीत आहे.