सुरेंद्र राऊत, यवतमाळ : एका घरात राहणाऱ्या समवयस्कर अल्पवयीन मुला-मुलीने व्हिडीओ पाहून संबंध ठेवले. सलग तीन महिन्यापासून हा प्रकार सुरू हाेता. कुटुंबातील कोणालाच साधा संशय आला नाही. लहान मुलं सोबत खेळत राहतात, याचाच आनंद होता. मात्र अचानक मुलीचे पोट दुखू लागले, तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला. सुरूवातीस डॉक्टरांनी पोटदुखीचा उपचार करूनही आराम पडला नाही. शेवटी सोनोग्राफी केली तेव्हा धक्कादायक प्रकार पुढे आला. मुलगी तीन महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. हे रिपोर्ट पाहून संपूर्ण कुटुंबच हादरून गेले.
शिक्षणासाठी आत्याकडेच मामे भाऊ राहत हाेता. त्याच्या साेबतच आत्याची मुलगी नेहमी खेळत बागडत असे. ज्या वयात मुलांचे खेळण्या बागडण्याचे दिवस असल्याने त्यांच्यात मुलगा-मुलगी असा भेद केला जात नाही. पालकांनाही याचा संशय येणे शक्यच नाही. दरराेज शाळेत जाणे घरी आल्यानंतर काही अभ्यास करून सोबत खेळ सुरू होता. अचानक मुलीला अपचन झाल्यासारखे उलट्या - मळमळ होऊ लागली. हा त्रास वाढत गेल्याने मुलीच्या आईने तिला खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले, डॉक्टरांनी तपासणी करून उलटी व मळमळ, पोटदुखी थांबविण्यासाठी औषधी दिली. मात्र हे औषध घेऊनही मुलीचा त्रास कमी हाेत नव्हता. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी मुलीची सोनोग्राफी तपासणी करण्यास सांगितले. सोनोग्राफीमध्ये मुलगी गरोदर असल्याचे पुढे आले. मुलीला आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिने संपूर्ण प्रकार सांगितला.
शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना मोबाइलवरील व्हिडीओ पाहून केलेले कृत्य कायदेशीर गुन्हा ठरला आहे. या प्रकरणात मुलीच्या तक्रारीवरून शहर पाोलिसांनी अल्पवयीन मामे भावा विरोधात कलम ३७६ (२) (न), (जे), (३) भादंवि, सह कलम ४, ६ पोक्सो नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहे.