शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

वणी परिसराला भीषण वादळाचा तडाखा: टिनपत्र्याचे शेड उडाले; झाडे, वीजखांब कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:35 IST

या वादळाचा फळबागांना चांगलाच फटका बसला. मंदर येथील आमराईचे मोठे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, वणी (यवतमाळ): शुक्रवारी वणी परिसराला भीषण वादळाचा तडाखा बसला. या वादळात अनेक ठिकाणचे टिनपत्र्याचे शेड उडून गेले, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीज खांब वाकले. यामुळे सायंकाळी ५.३० वाजता खंडित झालेला वणी शहरातील वीज पुरवठा शनिवारी पहाटे ३ वाजता सुरू झाला. परिणामी वणीकरांना अख्खी रात्र प्रचंड उकाड्यात जागरण करत काढावी लागली.

गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच असे भीषण वादळ पाहिल्याचे जाणकार सांगतात. शुक्रवारी संध्याकाळी वणी व परिसरात सुमारे एक तास हे  वादळ घोंघावले. वणी शहरातील जत्रा मैदानात सुरु असलेल्या यात्रेला व बैलबाजाराला याचा चांगलाच फटका बसला. वणी शहरासह काही भागात हे वादळ होते. या वादळाचा फळबागांना चांगलाच फटका बसला. मंदर येथील आमराईचे मोठे नुकसान झाले.

शुकवारी दि. १८ एप्रिल रोजी दुपारी वणी शहरात कडक ऊन होते. मात्र संध्याकाळी आकाशात अचानक ढगांनी गर्दी केली. त्यानंतर आकाशात वादळ घोंगावू लागले. वेगवान वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर वादळी वा-यासह पाऊस सुरु झाला. वादळी वा-यामुळे वणीतील काही परिसरातील घरांवरची टिनपत्रे उडाली. फुटपाथवर असलेल्या व्यावसायिकांचे साहित्य उडाले. काही कवेलुंच्या घरातील कवेलूंची नासधूस झाली. वादळाचा वेग इतका भयंकर होता की काही ऑफिसच्या कॅबिनच्या काचा देखील वादळामुळे फुटल्याची माहिती आहे. वणी शहरालगत असलेल्या शेतातील गोठ्यातील टिन उडाले. यासह अनेक झाडे उन्मळून पडली. तर काही झाडांच्या फांद्या तुटल्या. काही फांद्या व झाड ईलेक्ट्रीक पोलवर पडले. रस्त्यावरील अनेक झाडे कोसळली.

वादळाचा तडाखा इतका होता की वादळाने टिनपत्रे, झाडांच्या फांद्या तसेच अनेक वस्तू आपल्या कवेत घेतल्या. याचवेळी चारगाव चौकी जवळ काही दुचाकीस्वार वणीच्या दिशेने येत होते. वादळापासून स्वतःला वाचविण्यासाठी या दुचाकीस्वारांनी ट्रकखाली आसरा घेतला. वादळात टिनपत्रे उडताना त्यांनी बघितले. तसेच त्यांच्या डोळ्यादेखत पेट्रोल पम्पच्या कार्यालयाच्या कॅबिनची काच फुटली. तर चारगाव चौकीवरील दुस-या पेट्रोल पम्पच्या कार्यालयावर झाड कोसळले. हे वादळ इतके भयंकर होते की रस्त्याच्या कडेला जर आसरा घेण्यास ट्रक नसते, तर कदाचित जीवितहानी झाली असती.

टॅग्स :Yavatmalयवतमाळweatherहवामान अंदाज