शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

सोयाबीनच्या पडलेल्या दराला वाचविण्यासाठी सोशल वॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 5:30 PM

मुख्यमंत्र्यांना केले टॅग : 'अब की बार सोयाबीन सहा हजार पार'

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : खुल्या बाजारात सोयाबीनचे दर ३८०० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. पुढील काळात हे दर आणखी खाली येणार असल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने यावर पावले उचलावी म्हणून काँग्रेसच्या सोशल मीडियाने पावले उचलली आहेत. 'अब की बार सोयाबीन सहा हजार पार' या टॅगलाइनचा वापर करत मोहीम सुरू केली आहे. यात थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना टॅग केले जात आहे.

विद्यमान सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे दाखवत आहे. प्रत्यक्षात शेतमालाचे दर पडल्यानंतर ते सावरण्यासाठी कुठलीच उपाययोजना केली जात नाही. यातून शेती अडचणीत आली आहे. यावर मात करण्यासाठी थेट सोशल मीडियावरून रान उठविले जात आहे. प्रत्यक्ष आंदोलनासह सोशल मीडियावर या पद्धतीने आता आंदोलन छेडण्यात आले आहे. 

यामध्ये इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, एक्स या सोशल मीडियावर यवतमाळ जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी व्यक्त होणे सुरू केले आहे. त्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना टॅग केले जात आहे. यातून सोशल मीडियावर वादळ उठले आहे. 

सोयाबीन दरातील पडझडीविरोधात सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम हाती घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी नारायणराव बेंडे यांच्या ग्राम रातचांदना येथील शेतातून मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे पुढील काळात ही मोहीम अधिक गतिशील होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अशी झाली दरात पडझड २०२३-२४ या वर्षात सोयाबीनचा हमीभाव ४,६०० रुपये होता. गेल्यावर्षी ३५०० ते ४००० रुपये याच दराने सोयाबीनचे व्यवहार झाले. हमीदराच्या तुलनेत क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. २०२४-२५ करिता शासनाने ४८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारात दर घसरले आहेत. त्यात केंद्र शासनाने खाद्यतेल आयातीचा सपाटा लावला आहे. यामुळे सोयाबीनचे दर दबावात राहण्याचा धोका आहे. ३५०० ते ३८०० पर्यंत दर खाली येण्याचा धोका आहे. 

मोहिमेत स्मार्टफोनचा वापर या मोहिमेच्या शुभारंभाप्रसंगी सोयाबीन उत्पादक शेतकरी नारायणराव बेंडे, युवा शेतकरी शुभम बेंडे, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव सचिन मनवर, प्रा. पंढरी पाठे, नीलेश आगलावे, पार्वताबाई उमाटे, अशा वरणकार, रुखमा मेश्राम, चंदा वरणकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :YavatmalयवतमाळAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी