शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

लहान वयात नजर कमजोर शाळा देणार स्पेशल पुस्तक

By अविनाश साबापुरे | Published: June 29, 2024 6:55 PM

बालभारतीकडून 'लार्ज प्रिंट'चा प्रयोग : ठळक पुस्तके जिल्ह्यात दाखल

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : हल्ली मोबाइलचा अतिवापर त्यासोबतच जीवनसत्त्वांची कमतरता यांमुळे बालवयातच मुलांची नजर कमजोर होत आहे. अशा मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून 'बालभारती'ने यंदा 'लार्ज प्रिंट' पुस्तकांचा प्रयोग केला आहे. दृष्टी अधू असलेल्या मुलांना ही पाठ्यपुस्तके शाळेतून मोफत मिळणार आहेत. जिल्ह्यात या पुस्तकांची खेप दाखल झाली असून, संबंधित मुलांच्या पुस्तकं शाळांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.

समश्र शिक्षा अभियानातून दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके मोफत दिली जातात. या पुस्तकातील अक्षरे बालकांना वाचता येईल. इतक्या आकाराचीच असतात; परंतु, दृष्टी कमजोर असलेल्या मुलांसाठी तेवढी अक्षरेही वाचणे त्रासदायक ठरते. त्यातील बराचसा मजकूर त्यांना कमकुवत नजरेमुळे वाचता येत नाही; त्यामुळे अधू दृष्टीचे बालक हुशार असूनही अभ्यासात मागे पडण्याचा धोका निर्माण होतो. 

या समस्येवर उपाय म्हणून यंदा 'बालभारती'कडून अशा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 'लार्ज प्रिंट' पुस्तके तयार करण्यात आली आहेत. लार्ज प्रिंट पुस्तकात व सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पुस्तकातील अभ्यासक्रम, घटकांची क्रमवारी सारखीच आहे; परंतु, लार्ज प्रिंट पुस्तकाचा आकार सामान्य पुस्तकापेक्षा दुपटीहून मौठा आर्णी आहे. विद्यार्थ्यांच्या बाभूळगाव तळहातापासून ढोपरापर्यंत या दारव्हा पुस्तकाची लांबी रुंदी आहे. त्यातील अक्षरे ठळक आणि भरपूर मोठ्या आकाराची आहेत. त्यामुळे नजर कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांनाही है पुस्तक सहज वाचता येणार आहे. 

कोणत्या वर्गात किती 'लोव्हिजन 'पहिली - १२दुसरी - २१तिसरी - २६चौथी - ३१पाचवी - १८सहावी - २८ सातवी - २१आठवी - २२मुले - ९४मुली - ८५

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातीसमग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील लो व्हिजन विद्याथ्यांसाठी ही पुस्तके बालभारतीकडून पुरविण्यात आलेली आहेत. सोळाही पंचायत समिती स्तरावर या पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. १ जुलै रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी ही लार्ज प्रिंट पुस्तकेही संबंधित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हाती दिली जावी. असे निर्देश शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी दिले आहेत. या पुस्तकांच्या काटेकोर वितरणाची जबाबदारी समावेशित शिक्षण कक्षाचे जिल्हा समन्वयक निशांत परगणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

दिव्यांगांचे होणार सर्वेक्षणजो व्हीजन या प्रकाराचे अपंगत्य असलेले २७९ विद्यार्थी पहिली ते आठवीमध्ये दाखल आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील सर्वच दिव्यांगांचे सर्वेक्षण १ जुलैपासून सुरू केले जाणार आहे. सामान्य विद्यार्थ्यांसोबत एकाच वर्गात बसून दिव्यांगांनाही सहज शिक्षण घेता यावे, यासाठी समावेशित शिक्षणअंतर्गत विशेष शिक्षक प्रयत्नरत आहेत.

लार्ज प्रिंट पुस्तकाचे वैशिष्ट्य

  • ही पुस्तके दृष्टी कमजोर असलेल्या मुलांना नजरेपुढे ठेवून तयार करण्यात आली.
  • सामान्य पुस्तकांपेक्षा ही पुस्तके अडीचपट आकाराची आहे.
  • अभ्यासक्रम सारखाच असला तरी लार्ज प्रिंट पुस्तकातील अक्षरे दुप्पट आकाराची मोठी आहे. सहज वाचता वेतात.
टॅग्स :SchoolशाळाYavatmalयवतमाळ