दिग्रस (यवतमाळ) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर दिग्रस पोलिसांनी शहरातील ठिकठिकाणी महापुरुषांचे पुतळे स्वच्छ धुवून त्यांना आदरांजली वाहली. रविवारी हा अनोखा उपक्रम राबविला. त्यात नागरिकही उत्साहाने सहभागी झाले.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष कायम स्मरणात राहो या हेतूने विविध उपक्रम राबविले जात आहेत. नागरिकांचा पूर्ण सहभाग घेऊन शहरात जातीय सलोखा वृध्दींगत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. पवन बन्सोड, उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर व पोलीस निरीक्षक धर्मराज सोनुने यांच्या मार्गदर्शनात शहरातील पुतळे स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, भगतसिंग पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याची स्वच्छता केली. सोबतच आजूबाजूचा परिसरही धुवून काढला. या मोहीमेत नगरपरिषदेचे आश्विन इंगळे, सागर शेळके, अब्दुल नासीर, अंकुश इंगोले, सहदेव उघडे, रोहन पवार यांच्यासह दिग्रस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय रत्नपारखी, पोलिस उपनिरीक्षक विशाल बोरकर, विनोष जाधव, चेतन चव्हाण, राजेश लाखकर व कर्मचारी सहभागी झाले होते.