शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

आसूड यात्रा यवतमाळात

By admin | Published: April 13, 2017 12:49 AM

सध्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या लुटीवर आधारित आहे. ही लूट अशीच पाहात राहाल,

लुटीवर आधारित व्यवस्था : शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन यवतमाळ : सध्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या लुटीवर आधारित आहे. ही लूट अशीच पाहात राहाल, तर वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. याविरूद्ध शेतकऱ्यांनी पेटून उठावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. ‘सीएम टू पीम’ या शेतकरी आसूड यात्रेला नागपुरातून सुरूवात झाली. ही यात्रा बुधवारी यवतमाळात धडकली. त्यावेळी आमदार बच्चू कडू मेडिकल कॉलेज चौकातील बचत भवनात आयोजित जनता दरबारात बोलत होते. ही यात्रा २१ एप्रिलला गुजरातमधील वडनगरला पोहचणार असल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हातात विविध पक्षांचा झेंडा थोपविला जातो. हा झेंडा हातात घेतला की शेतकरी आपल्या समस्या विसरून जातात. खरे तर एकसारख्या शेतकरी आत्महत्यांनी राज्य हादरले आहे. तरीही सरकार काहीच करायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यातील १६ लाख कर्मचाऱ्यांपुढे हे सरकार गरागर वाकते. मात्र आठ कोटी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार साधा विचारही करीत नाही. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. देशाचे पंतप्रधान खोटारडे असल्याचा आरोप करून ते म्हणाले, ते केवळ मोठमोठ्या घोषणा करण्याच धन्यता मानतात. शेतकऱ्यांना थापा मारतात. नोटाबंदीत भाजपाचाच सर्वाधिक लाभ झाल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे ताळेबंद बदलत असेल, तर एक लाख कोटी खर्च करून बुलेट ट्रेन आणण्याची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांसाठी सरकारला काहीच करायचे नसून मुख्यमंत्रीही ठोस पावले उचलायला तयार नाही. हा प्रकार गंभीर असून यवतमाळ जिल्ह्यात आणखी मोठे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील सर्वात मोठा प्रतिकात्मक पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, कालिदास आपटे, प्रा. प्रवीण देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. एका बालकाने शेतकऱ्यांवर आधारित कविता सादर केली. त्यामुळे सर्वच भारावून गेले होते. (शहर वार्ताहर) शेतकऱ्यांना शपथ जनता दरबारात शेतकऱ्यांना एकजुटीची शपथ देण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार कोडगे झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. उद्योजकांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकार पुढे सरसावत असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी मात्र राज्याचा ताळेबंद बदलतो, असे सांगत असल्याबद्दल चिड व्यक्त केली गेली.